Adwaya Hire should apologize to Maratha community | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

अव्दय हिरेंनी मराठा समाजाची माफी मागावी : मावळा संघटना 

निखिल सूर्यवंशी 
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

धुळे  :  महापालिका निवडणुकीत जातींचा उल्लेख टाळावा या मागणीचे निवेदन शुक्रवारी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांना देताना मावळा संघटनेचे पदाधिकारी. 

धुळे: मराठा समाजाचा नामोल्लेख करत दलाल 'तिकिट' वाटतो, असा उल्लेख मालेगाव येथील नेते अव्दय हिरे यांनी गुरूवारी धुळ्यातील पत्रकार परिषदेत केला. या विधानातून त्यांनी मराठा समाजाची बदनामी केली आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी मागणी मावळा संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे आज केली. 

संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा चंचल पवार, सुरेश सूर्यवंशी, प्रफुल्ल माने, प्रतिभा सूर्यवंशी, भटू पाटील, संदीप शिंदे, विजय पवार, सचिन मराठे, तुषार भदाणे, वीरेंद्र मोरे, अमर फरतळे, नैनेश साळुंखे, भूषण पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे, की येथील महापालिका निवडणुकीत मराठा समाजाचा उल्लेख करून जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. मराठा समाजाचा कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नसून कोणीही दिशाभूल करू नये. हिरे यांनी मराठा समाजाचा उल्लेख करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला असून त्याबद्दल माफी मागावी. 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हिरे आणि राजकीय पक्षाच्या काही लोकांनी पत्रकार परिषदेत मराठा समाजासह दलाल तिकिट विकतो, असा उल्लेख केला आहे. त्यामुळे मराठा समाजाची बदनामी होत आहे. त्यामुळे हिरे यांनी मराठा समाजाची माफी मागावी. सलोखा टिकावा म्हणून जातीपातीचा उल्लेख टाळावा, असे संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

संबंधित लेख