advayat hire, bjp, nashi | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

भाजप तिकिट देवो अगर राहो, मी लढणारच : अद्वय हिरेंची गर्जना 

संपत देवगिरे 
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

नाशिक ः लोकसभा, विधानसभा निवडणूकांना बराच कालावधी आहे. त्याआधीच नाशिकचे राजकारण तापले आहे. भाजप नेते अद्वय हिरे यांनी मालेगाव बाह्य विधानसभा आणि धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याचे जाहीर केले आहे. भाजपकडे उमेदवारी मागणार नाही. त्यांनी स्वतःच उमेदवारी द्यावी. मी निवडणूक लढवणारच अशी गर्जना करुन त्यांनी एकाचवेळी भाजपचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री दादा भूसे यांना आव्हान दिले आहे. 

"भाजप उमेदवारी देवो अथवा न देवो निवडणूक लढवणारच. आपली उमेदवारी पद, प्रतिष्ठेसाठी नव्हे. प्रामाणिक कार्यकर्ते, जनतेसाठी आहे. पक्षाकडून कोणतीही अपेक्षा नसल्याने पक्षाने स्वतःच उमेदवारी द्यावी. मी उमेदवारी मागणार नाही. अन्‌ उमेदवारीसाठी रांगेत उभाही राहणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. मालेगाव बाह्य (दाभाडी) हा भाऊसाहेब हिरे यांच्यापासून हिरे कुटुंबियांचा परंपरागत मतदारसंघ आहे. गेल्या काही निवडणूकांत शिवसेनेचे दादा भूसे यांनी मोठे आव्हान उभे केले. 2014 लोकसभा निवडणूकीतही त्यांची धुळे मतदारसंघातून दावेदारी होती. मात्र ऐनवेळी डॉ. भामरे यांचे नाव पुढे आले होते. यंदा माजी राज्यमंत्री प्रशांत हिरेंची नाशिक लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणूनही चर्चा आहे. त्यामुळे अद्वय हिरे यांच्या घोषणेने केंद्रीय अन्‌ राज्य मंत्रिमंडळातील दोन्ही राज्यमंत्र्यांना हे आव्हान आहे. त्याने या मतदारसंघात राजकीय चर्चा तापली आहे. 

हिरे यांनी कार्यकर्त्यांशी संवादात, "भाजपने गेल्या तीन वर्षात उल्लेखनीय काम केले. राज्यात व देशात भाजप नंबर एकचा पक्ष बनला आहे. त्यामुळे आपल्याला सुवर्णसंधी आहे. मात्र माझे अस्तित्व भाजपवर अवलंबून नाही. मी सर्वार्थाने योग्य उमेदवार आहे. आजवर आम्ही अनेकांना संधी देवून मोठे केले. त्यातील काहींनी वैयक्तिक लोभासाठी ईमान विकले. मात्र स्वाभीमानी व प्रामाणिक कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत. त्यांच्या हितासाठी मी निवडणूक लढविणार आहे. असे सांगितले. 

शिवसेनेचे राज्यमंत्री व हिरेंचे पारंपारीक विरोधक दादा भूसे यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली. "लग्नाच्या मिरवणुकीत नाचणे. उठसुठ कोणत्याही कार्यक्रमांना हजेरी लावणे हे लोकप्रतिनिधीचे काम नाही. जनतेचे प्रश्‍न सोडविण्याचे काम मी करेन. विरोधकांमध्ये आमचा पराभव करण्याची ताकद नाही. उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवू असे जाहीर केले. त्यामुळे हा भाजपसह केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भामरे यांना सरळ सरळ राजकीय आव्हान मानले जात आहे. 
 
संबंधित लेख