aditya thakrey in parliament | Sarkarnama

आदित्य ठाकरेंची दिल्ली स्वारी; शिवसेनेचे सारे खासदार दक्ष

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज संसद भवनात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर व हर्षवर्धन या केंद्रीय मंत्र्यांशी विविध मुद्यांवर चर्चा केली. महाराष्ट्राच्या धर्तीवर देशभरात प्लॅस्टिकबंदी लागू करावी अशी सूचनावजा मागणी त्यांनी पर्यावरणमंत्री हर्षवर्धन यांच्यासमोर मांडली.
 
ठाकरे आज सकाळी संसद भवनात आले. यावेळी शिवसेनेचे सारे खासदार हजर होते. गडकरी यांच्याशी चर्चेत ठाकरे यांनी, महामार्गांवर ज्या भागात जास्त पाऊस पडतो तेथे रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे व उन्हाळ्याच्या दिवसांत त्या भागात सौरउर्जेच्या दिव्यांचा वापर वाढवावा असे सांगितले. 

जावडेकर यांच्या भेटीदरम्यान ठाकरे यांनी, मुख्यतः मुलींच्या सुरक्षेचा व खासगी शाळांतील डोनेशन-राजचा मुद्दा जोरदारपणे मांडला. अगदी शिशुवर्गांपासून सर्व टप्प्यांवर या शाळा अव्वाच्या सव्वा डोनेशन घेतात. आईवडीलांच्या मुलाखती घेतात. हे प्रकार कायद्याने बंद व्हायला हवेत असे मत त्यांनी मांडले. यांच्यासाठी काही कायदे नाहीत व शिक्षण हक्क कायद्यातही याबाबत कोठे अटकाव करण्याची तरतूद नाही. प्री मॉंटेसरीसाठी प्रवेशाबाबत वेगळा कायदा असावा व या शाळाचालकांना माहितीचा अदिकार कायदा बंधनकारक करावा असा मागण्या त्यांनी केल्या. त्याचप्रमाणे मुलींना मुलांनाही पाचवीपासूनच स्वयंसुरक्षा, चांगला-वाईट स्पर्श यांची माहिती होण्याबाबत शाळांमध्येच शिक्षम दिले जावे, अशीही मागणी ठाकरे यांनी केली. 

तुम्ही यापूर्वी विधानभवनात गेला होतात व आज संसदेत आला आहात. तुम्हाला कोठे काम करायला आवडेल,' हा प्रश्‍न टोलवताना आदित्य ठाकरे यांनी, "" आगामी निवडणुकीत शिवसेनेचे आमदार व खासदार हे दोन्ही जास्तीत जास्त निवडून आणायचे आहेत. त्यामुळे मला दोन्ही ठिकाणी आवडते,'' असे सांगितले. 
 
संबंधित लेख