Aditya Thakre Stopped Speech of Mayor | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

अजान सुरू होताच आदित्य ठाकरे यांनी महापौरांचे भाषण थांबवले 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 23 डिसेंबर 2018

महापालिकेच्या वतीने क्रांतीचौकात स्मार्टसिटी अंतर्गत शहर बससेवेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज (ता.23) दुपारी करण्यात आले. त्यानंतर शेजारीच उभारलेल्या व्यासपाठीवर छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार इम्तियाज जलील, अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह युतीचे अनेक नेते व्यासपीठावर हजर होते. 

औरंगाबाद : महापौर नंदकुमार घोडेले यांचे भाषण सुरू असतांना अजान सुरू झाली, हे लक्षात येताच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महापौरांना त्यांचे भाषण थांबवण्याचा इशारा केला. काही मिनिटे थांबून अजान झाल्यावर पुन्हा भाषणाला सुरुवात झाली. 

महापालिकेच्या वतीने क्रांतीचौकात स्मार्टसिटी अंतर्गत शहर बससेवेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज (ता.23) दुपारी करण्यात आले. त्यानंतर शेजारीच उभारलेल्या व्यासपाठीवर छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार इम्तियाज जलील, अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह युतीचे अनेक नेते व्यासपीठावर हजर होते. 

महापौर नंदकुमार घोडेले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी उभे राहिले. त्यांचे भाषण सुरू असतांनाच शेजीरच असलेल्या मशीदीतून अजान सुरू झाली. अजान कानावार येताच आदित्य ठाकरे यांनी महापौरांना भाषण थांबवण्यास सांगितले. काही मिनिटांनी अजान संपल्यावर कार्यक्रम पुन्हा पुर्ववत सुरू करण्यात आला. आदित्य ठाकरे गेल्या महिन्यात विदर्भ दौऱ्यावर गेले होते. त्यापूर्वी मुंबईत देखील त्यांनी अजान सुरू असतांना भाषण थांबवल्याची उदाहरणे समोर आली होती. त्यानंतर औरंगाबादेत देखील त्यांनी अजानचा मान ठेवत भाषण थांबवल्याचे पाहून उपस्थितांमध्ये चर्चा रंगली होती.

संबंधित लेख