aditya thakare | Sarkarnama

जस्टिन बिबरच्या दरबारात युवासेना प्रमुख

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 मे 2017

मुंबई : राज्यात हुकमत गाजवणाऱ्या ठाकरे परिवारातील तिसऱ्या पिढीने आपल्या कुटुंबाच्या परंपरेलाच छेद दिला. काल नवी मुंबईत पॉंप स्टार जस्टिन बिबर याच्या "दरबाराला' खुद्द युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

आपल्या गाण्यांनी जगाला वेड लावणाऱ्या जस्टिन बिबर सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. काल जस्टीन बिबरची आदित्य ठाकरे यांनी नवी मुंबईत भेट घेतली. हॉटेलमध्ये झालेल्या भेटीत जस्टीन बिबर आणि आदित्य ठाकरे यांनी दोन तास चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कॅनेडियन पॉंपस्टार जस्टिन बिबरचा करिष्मा अनुभवायला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नेरूळ येथे हजेरी लावल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. 

काही वर्षांपूर्वी जगप्रसिद्ध पॉपस्टार मायकेल जॅक्‍सनही भारतात आला होता. त्यावेळी मुंबईत पॉंप स्टार मायकल जॅंक्‍सन याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मायकल जॅंक्‍सनने मातोश्रीवर जावून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची व मायकल जॅंक्‍सनच्या भेटीची चर्चा चांगलीच रंगली होती.

यावेळी त्या भेटी प्रमाणेच आदित्य ठाकरे आणि जस्टिन बिबरच्या भेटीची चर्चा होत आहे. ठाकरे परिवाराच्या संगीत प्रेमाची अनेक उदाहरणे सांगितली जातात. त्यात आता बिबरप्रेमी आदित्यची भर पडणार आहे. मात्र, यापूर्वी शिवसेनेचा मुंबईत असलेला दरारा संपला की काय अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. 

संबंधित लेख