aditya thacktay tips student self defence | Sarkarnama

मुलींनो, हल्लेखोरांच्या नाक, तोंड, डोळ्यांवर हल्ला करा पण, केस सांभाळा ! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 12 जानेवारी 2019

नाशिक :युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी सध्या युवतींसाठी स्वसंरक्षणासाठींच्या उपक्रमांवर भर दिला आहे. नाशिक रोडच्या क्रीडासंकुलाच्या उद्‌घाटनानिमित्त हा झालेल्या कार्यक्रमात खास शिबिर झाले. यावेळी त्यांनी मुलींना स्वसंरक्षणाच्या टिप्स देत प्रतिनिधीक स्वरुपात काही स्टंट करुन दाखवले. त्यांचे स्टंट पाहून विद्यार्थीनींनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. 

आदित्य ठाकरे यांनी यावेळी विद्यार्थीनी, नगरसेवक आणि राजकीय नेत्यांसमवेत संवाद साधत सेल्फी काढल्या. त्यासाठी झुंबड उडाली होती. मात्र सहकारी पक्ष भाजपच्या नगरसेवकांनी हा कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. 

प्रतिमापूजन व कोनशिला अनावरणानंतर थेट क्रीडांगणातील व्यासपीठावर येत ठाकरे यांनी औपचारिक भाषणबाजीला फाटा देत जमलेल्या विविध शाळांमधील विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांना टिप्स दिल्या.

ठाकरे म्हणाले, "" दैनंदिन कामकाजात, वावरतांना आपल्याला कुणी "फॉलो' करतं का? करत असल्यास सजग राहा, घटना सांगून घडत नाही, त्यामुळे समोरून हल्ला झाल्यास किंवा हल्लेखोर मागून आल्यास काय कराल. प्रतिहल्ला नेमक्‍या कोणत्या क्षणी करायचा, तो करताना कशाला लक्ष्य करायचे, याबाबत हल्लेखोरांचे कच्चे दुवे सांगीतले. विद्यार्थिनींशी प्रश्‍नोत्तर स्वरूपात संवाद फुलवत नेला.

ते म्हणाले, मुलींनो कोणी आगळीक करीत असेल तर पुढे होत डोळे, नाक, तोंड यावरच हल्ला करायचा. हल्लखोराच्या हातात महिलांनी त्यांचे केस जाऊ द्यायचे नाहीत, त्यामुळे प्रतिकाराची धार बोथट होते. 

शिवसेनेसह राजकीय पक्षाच्या पारंपरिक उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाला बगल देणारा असाच हा कार्यक्रम झाला. यावेळी संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, महिला आघाडीच्या सत्यभामा गाडेकर, नगरसेविका मंगला आढाव, नगरसेवक प्रशांत दिवे, विभागप्रमुख नितीन चिडे आदींसह शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख