aditya thackray birthday | Sarkarnama

 आजचा वाढदिवस 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 जून 2018

आदित्य ठाकरे, शिवसेना नेते 

आदित्य ठाकरे, शिवसेना नेते 

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा पक्षातील प्रवास युवा सेनेचे अध्यक्ष म्हणून झाला. त्यांनी पक्ष वाढीसाठी युवकांचे संघटन केले. मुंबई विद्यापिठाची निवडणूक असो की राज्यातील कोणतीही निवडणूक आदित्य ठाकरेंचा सहभाग नाही असे कधी झाले नाही. शिवसेनेच्या महत्वाच्या निर्णयात त्यांचाही सहभाग असतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ते पूत्र आहेत. ठाकरे घराण्याचा वारसा लाभलेल्या आदित्य ठाकरे यांच्यावर आता नेतेपदाची जबाबदारी येऊन पडली आहे. राजकारणाबरोबरच समाजकारण आणि युवकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेहमीच त्यांचा पुढाकार असतो.  

 
 

संबंधित लेख