Aditya Thackeray says forest ministry should be renamed as ministry of poaching | Sarkarnama

आदित्य ठाकरे म्हणतात, वन खात्याचे शिकारी खाते असे नामांतर करा !

प्रशांत बारसिंग
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

दहशत निर्माण करणाऱ्या यवतमाळच्या वाघिणीला शुक्रवारी रात्री वन विभागाच्या पथकाने ठार मारले. या वाघिणीला आधी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तिने चमूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने तिला गोळी घालण्यात आली.

मुंबई:  अवनी किंवा टी-1 या वाघिणीला मारताना वन्य जीव नियमांचा अवलंब योग्य प्रकारे केला गेला नसल्याचा संशय वन्यजीव प्रेमींकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, टी-वन वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनीही वन मंत्रालयावर टीका केली आहे. वन खात्याचे नाव बदलून 'शिकारी' खाते असे करायला हवे, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी ट्‌विटरद्वारे केली आहे

न्यायालयाकडून वाघिणीला मारण्याची परवानगी होती का, तिला बेशुद्ध करून पकडता आले नसते का, एक वन्यजीवप्रेमी म्हणून आपल्याला पडलेले हे प्रश्न आहेत. मात्र आज अवनीला ठार केले उद्या तिच्या बछड्यांचा किंवा आणखी दुसऱ्या वाघाचा बळी घेतला जाईल, असा असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दहशत निर्माण करणाऱ्या यवतमाळच्या वाघिणीला शुक्रवारी रात्री वन विभागाच्या पथकाने ठार मारले. या वाघिणीला आधी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तिने चमूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने तिला गोळी घालण्यात आली.

वन विभागाने दिलेल्या या माहितीवर संशय उपस्थित करण्यात येत आहेत. बेशुद्ध करण्याचे प्रयत्न न करता थेट तिला गोळी घालण्यात आली आणि त्यानंतर केवळ छायाचित्रासाठी या वाघिणीला डार्ट लावण्यात आला असा संशय वन्यप्रेमी व्यक्त करीत आहेत. 

संबंधित लेख