अखेर कॉंग्रेसने दिली अधीर चौधरींना सूत्रे

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आपल्या नकारावर अडून बसल्यानंतर नाईलाज झालेल्या कॉंग्रेसच्या कारभाऱ्यांनी लोकसभेतील कॉंग्रेसचे पक्षनेते म्हणून अधीर रंजन चौधरी यांची निवड केली आहे.
अखेर कॉंग्रेसने दिली अधीर चौधरींना सूत्रे

नवी दिल्ली - कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आपल्या नकारावर अडून बसल्यानंतर नाईलाज झालेल्या कॉंग्रेसच्या कारभाऱ्यांनी लोकसभेतील कॉंग्रेसचे पक्षनेते म्हणून अधीर रंजन चौधरी यांची निवड केली आहे. 

मल्लिकार्जुन खरगे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांच्या जागी कोण, हा प्रश्न निर्माण झाला होता. सद्यस्थितीत राहुल गांधी यांनी लोकसभेत कॉंग्रेसचे नेतृत्व स्वीकारावे म्हणून पक्षातील कारभाऱ्यांनी खूप प्रयत्न केले होते. पण राहुल गांधी आपल्या नकारावर ठाम राहिले. 

अखेर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत या विषयावर प्रदीर्घ चर्चेअंती अधीर रंजन चौधरी यांचे नाव निश्चित झाले. त्यानंतर लोकसभेच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून तशी माहिती देण्यात आली. 

विरोधी पक्षातील सर्वांत मोठ्या पक्षाचे नेते म्हणून अधीर रंजन चौधरी हे लोकसभेच्या सर्व महत्त्वाच्या कमिट्यांवर असणार आहेत. शिवाय सरकारवर तोफ डागण्याची जबाबदारीही त्यांच्यावर राहील. 

अधीर रंजन चौधरी यांच्याशिवाय केरळाचे खासदार के. सुरेश, प्रवक्ते मनीष तिवारी आणि शशी थरुर यांचीही नावे या पदासाठी चर्चेत होती. 

अधीर रंजन चौधरी राजीव गांधींच्या काळात कॉंग्रेसमध्ये आलेले आहेत. ते मूळचे पश्चिम बंगालचे आहेत. 1996 मध्ये ते आमदार झाले. 1999 मध्ये ते पहिल्यांदा बेहेरामपूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. सलग पाचव्यांदा ते खासदार म्हणून निवडून आलेले असून त्यांनी लोकसभेच्या विविध समित्यांवरही काम केलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com