adhalrao patil snubs ncp | Sarkarnama

राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांना लक्ष घालावे लागले : आढळरावांचा खोचक टोला

गणेश कोरे
सोमवार, 17 डिसेंबर 2018

पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसला उमेदवार न सापडणे ही खुप मोठी समस्या असून, मुख्यमंत्र्यांना यामध्ये लक्ष घालावे लागले आहे. तर मुख्यमंत्र्यांनी दिलीप वळसे पाटलांना दिलेली आॅफर भाजपाकडुन आहे का, असा खोचक सवाल विचारत शिवसेनेचे शिरूरमधील खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विचारला. मुख्यमंत्र्यांना माहित नसावे हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे, अशी टिप्पणी आढळराव पाटील यांनी केली.
  
वसंतदादा साखर संस्थेच्या (व्हीएसआय) नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात दिलीप वळसे पाटील यांची राष्ट्रीय साखर संघावर फेरनिवड झाल्याच्या निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वळसे पाटलांना आता दिल्लीत आहात तर लोकसभा लढवा असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या समोर दिला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार आदि नेत्यांमध्ये हास्याची लकेर उमटली. 

यानंतर खासदार आढळराव पाटील यांनी आजच्या झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला उमेदवार न सापडणे म्हणजे नामुष्की आहे. त्यात खुद्द मुख्यमंत्र्यांना लक्ष घालावे लागले, असा चिमटा काढला. दरम्यान नारायणगाव येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी आठ दिवसांत उमेदवार जाहीर करू असे म्हटले होते. मात्र आता पंधराहून अधिक दिवस झाले तरी अद्याप उमेदवार जाहीर न झाल्याने साहजिकच राष्ट्रवादीत उत्सुकता वाढली आहे. 

संबंधित लेख