adhalrao patil and walase patil join same dais | Sarkarnama

आढळराव आणि वळसे पाटलांना बोलावून पिंपरखेडच्या ग्रामस्थांचा राजकीय काला

युनूस तांबोळी
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

टाकळी हाजी : शिरूरचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांना एकाच व्यासपीठावर बोलावून पिंपरखेड (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी `राजकीय काला` केला. लोकसभा निवडणुकीचे वातावरण पेटलेले असताना त्यांच्या एकत्रित येण्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

टाकळी हाजी : शिरूरचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांना एकाच व्यासपीठावर बोलावून पिंपरखेड (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी `राजकीय काला` केला. लोकसभा निवडणुकीचे वातावरण पेटलेले असताना त्यांच्या एकत्रित येण्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

या कार्यक्रमात दोघे एकत्र असले तरी कोणतीही राजकीय टिप्पणी न करण्याची खबरदारी दोघांनीही घेतली. वळसे पाटील यांनी  देशातील साखर कारखाने अडचणीत असून एफआरपी प्रमाणे भाव देऊ शकत नाही. असे असले तरी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना मार्च पूर्वी 2667 रूपये ठरलेली एफआरपी खात्यात जमा केली करेल. तेवढी कर्जमाफी करा. शेतमालाला बाजारभाव द्या. नाही तर कांद्याला तरी बाजारभाव द्या, अशी मागणी व्यासपीठावरूनच आढळराव यांच्याकडे केली. यावर उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या. या व्यतिरिक्त दोघांत चकमक काही घडली नाही. 

राजकीय फुलबाज्यांची अपेक्षा माजी सभापती मंगलदास बांदल यांनी भरून काढली. पिंपरखेड येथील ग्रामस्थांनी दिग्गज विरोधी नेत्यांना एकत्रित आणून चांगलाच काला केल्याचे दिसून येत, अशी टिप्पणी त्यांनी केली.  त्यावेळी कांद्याची चार रूपये पट्टी आल्याची पावती एका कार्यकर्त्याने त्यांना पाठवली. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, कांद्यावर बोलायला माजी उंची कमी आहे. तुम्ही माझी उंची वाढवण्याचा विचार करा. (लोकसभेला निवडून द्या ) त्यावेळी नक्की बोलेल, असे म्हणत सरकारवर टीका करण्याचे टाळले.

त्यावर दुसऱ्या कार्यकर्त्याने त्यांना चिठ्ठी पाठवली. या वेळी कुस्ती करायची तयारी आहे काय, असा प्रश्न त्यात विचारला होता.  त्यावर ते म्हणाले की मी लाल मातीचा पहिलवान आहे. निवडणुकीचं रान उठू द्या. जसजसी माती उधळलं, तशी मजा येणार हाय. एकदा निवडणुकीचा आखाडा भरू द्या. तुम्ही मायबापांनी ठरवा. मग काय एकदा लंगोट बांधल्यावर माघार घेत नसतो, असे सांगत शिरूर लोकसभेसाठी इच्छूक असल्याचे आवर्जून सांगितले. दोन पाटलांच्या उपस्थितीत बांदल यांनी हा दावा केल्याने साहजिकच हास्याचे फवारे उडाले. 

संबंधित लेख