adhalrao criticizes walase patil | Sarkarnama

नकारात्मक वळसे पाटलांकडून पवार साहेबांचीही दिशाभूल : आढळरावांचा गौप्यस्फोट

भरत पचंगे
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

शिक्रापूर : केवळ मराठा आरक्षणाबाबतच नाही तर पुणे जिल्ह्यातील विमानतळ, पुणे-नाशिक रेल्वे, अष्टविनायक मार्ग, पीएमआरडीए आणि अगदी भीमाशंकर देवस्थान या प्रत्येक बाबतीत नकारात्मक भूमिका घेतल्याचा इतिहास असलेले दिलीप वळसे पाटील हे नकारात्मक राजकारणी असून मराठा आरक्षणाबाबत वळसेंनी जास्त बोलण्यापेक्षा भाजपा-शिवसेनेचे अभिनंदन करुन गप्प बसावे, असा सल्ला आढळराव यांनी थेट वळसे पाटलांना दिला. 

शिक्रापूर : केवळ मराठा आरक्षणाबाबतच नाही तर पुणे जिल्ह्यातील विमानतळ, पुणे-नाशिक रेल्वे, अष्टविनायक मार्ग, पीएमआरडीए आणि अगदी भीमाशंकर देवस्थान या प्रत्येक बाबतीत नकारात्मक भूमिका घेतल्याचा इतिहास असलेले दिलीप वळसे पाटील हे नकारात्मक राजकारणी असून मराठा आरक्षणाबाबत वळसेंनी जास्त बोलण्यापेक्षा भाजपा-शिवसेनेचे अभिनंदन करुन गप्प बसावे, असा सल्ला आढळराव यांनी थेट वळसे पाटलांना दिला. 

मराठा आरक्षण भाजपा-शिवसेना युतीने जाहिर केल्यानंतर वळसे पाटलांना पोटदुखी सुरू झाल्याची टीका आढळराव यांनी चार दिवसांपूर्वी केल्याने वळसे पाटलांनी पत्रकार परिषद घेवून आढळराव दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला होता. त्यालाच प्रतिउत्तर म्हणून आढळराव यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले.

त्यांच्या  म्हणण्यानुसार गेल्या पंधरा वर्षात राज्यासह जिल्ह्यातील अनेक प्रश्न प्रलंबित राहिले ते राष्ट्रवादी आणि वळसे पाटलांमुळेच. मुळात नसलेले प्रश्न निर्माण करण्यातही वळसे पाटील वाकबगार आहेत त्याचे चांगले उदाहरण म्हणजे बैलगाडा शर्यती. सन २००५, २००८ व पुन्हा सन २००११ मध्ये त्यांचेच सरकार असतानाच बैलगाडा शर्यती का बंद झाल्या?

खेडमध्ये जागेअभावी विमानतळ होवू शकणार नाही हा अहवाल सन २०१२ मध्ये आला असताना तो जाहीर का केला नाही? आणि तुम्ही कर्तुत्त्ववान होतात आणि केंद्रात-राज्यात तेच सत्तेत होते मग विमानतळ परत का गेले?, पुणे-नाशिक रेल्वे तुमच्या कोणत्या नेत्याला ठाऊक तरी आहे का? त्यांच्याच काळात सुरू झालेला एसईझेड प्रकल्प कार्यान्वित का झाला नाही?, पीएमआरडीए सन १९९५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री युतीचे मनोहर जोशी यांनी स्थापन केली. त्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०१५ मध्ये चालू केले. वीस वर्षात पीएमआरडीएबाबत वळसे पाटलांनी नेमके केले काय? भीमाशंकर देवस्थानचे तब्बल दहा वर्षे अध्यक्ष असताना तेथे एक रुपयाही न देणा-या या नकारात्मक अर्थमंत्र्याच्या नाकावर टिच्चून युतीचे विद्यमान अर्थमंत्री मुनगुंटीवार यांनी दिडशे कोटी रुपये नुकतेच दिले मग आत्तापर्यंत दिशाभूल कोणी केली आता त्यांनीच सांगावेच, अशी प्रश्नांची सरबत्ती आढळराव यांनी केली आहे.

बेल्हा-जेजुरी मार्ग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि अष्टविनायाक मार्गाचे ढोल आत्ता ते आमच्या सत्ताकाळात वाजवतायत. केवळ पवार साहेबांच्या कृपेमुळे विधानसभा अध्यक्षपद, शिक्षणमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद मिळालंय पण केवळ नकारात्मक विचारसरणीमुळे वरील एकाही प्रकल्पात वळसेंना काहीच करता आलेले नाही. हीच नकारात्मक विचारसरणी परवा मराठ्यांच्या आरक्षणाच्या वेळी सभागृहात मांडल्याने त्यांनी आता सकल मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी आढळराव यांनी केली.

तुम्ही लोकसभेच्या तयारीला लागा, असे पवार साहेबांनी मला सन २००४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सांगितल्याचे वळसे पाटलांना कळाले. त्यानंतर माझ्या बाबतीत पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याची वळसे पाटलांनी दिशाभूल केली. त्याचा फटका त्यांच्याच पक्षाला बसला. हे सर्वश्रुत असल्याचा गौप्यस्फोटही आढळराव यांनी केला. 

 

संबंधित लेख