Adhalrao challenges Walse Patil to contest against him | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

आढळरावांचे वळसे-पाटीलांना चॅलेंज : हिंमत असेल तर तुम्ही स्वत:च  मैदानात उतरा !

भरत  पचंगे 
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

वळसे पाटलांनीच खासदारकी लढून दाखवावी..
 " तब्बल तीन पंचवार्षीक खासदार शिवाजीराव आढळराव निवडून येत आहेत .आढळराव यांचेवर एकसारखी टिका करणारे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनीच खासदारकी लढून दाखवावी," असे
आव्हान शिवसेनेच्या नेत्या व जिल्हा बॅंकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे यांनी पाबळ येथे दिले.  

शिक्रापूर :  " हिंमत असेल तर टिंगु-मुंगूला पुढे करु नका! वळसे-पाटील तुम्ही स्वत:च या मैदानात उतरा आणि आपण समोरासमोर बोलू ," अशा  शब्दात खासदार शिवाजीराव आढळराव यांनी युद्धाला  पाबळ (ता.शिरूर) येथे झालेल्या खासदार आपल्या दारी कार्यक्रमात आढळराव यांनी वळसे पाटलांना हे चॅलेंज दिले आहे . 

 १५ वर्षे केंद्र आणि राज्यात सत्ता असतानाही चाकण-विमानतळ पुरंदरला गेल्याला वळसे पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला. 

मागील आठवड्यात जेष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या केंदूर (ता.शिरूर) येथील कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व माजी आमदार पोपटराव गावडे यांनी खासदार शिवाजीराव आढळराव यांचेवर चाकण-विमानतळ, एसईझेड व पुणे-नाशिक रेल्वे या प्रश्नांवरुन कडक भाषेत टिका केली होती. याच वेळी वळसे पाटील यांनीही आढळराव यांचा नामोल्लेख टाळून खरमरीत टिका केली होती.

 या सर्वच मुद्द्यांचा परामर्श घेत आढळराव यांनी थेट वळसे पाटलांनाच लक्ष्य केले. दरम्यान विवेक वळसे पाटील आणि पोपटराव गावडे हे वळसे पाटलांच्या संमतीशिवाय आवाक्षरही काढणार नसल्याचे सुचित करुन या दोघांचा उल्लेख  टिंगु-मुंगू असा करीत चौफेर टोलेबाजी केली. 

आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर देताना खा. आढळराव म्हणाले,", चाकण भागात विमानतळाचा प्रस्ताव १६ वर्षांपूर्वी पासून होता. सलग ५५०० एकर सपाट जागा या भागात कुठेच उपलब्ध होत नव्हती हे विमानतळ प्राधिकरणाने पूर्वीच जाहिर केले. तरीही लोहगाव सारख्याच एका धावपट्टीच्या छोट्या विमानतळासाठी १२५० एकराचा एसईझेड मधील जागेचा प्रस्ताव उद्योगपती बाबा कल्याणी यांनी  राज्य सरकारला दिल्यावर तो राज्य सरकारने मंजुर केला आणि लगेच सर्व्हे करुन त्याला मंजुरीही दिली गेली. "

" मात्र प्रत्यक्षात लोहगाव एवढ्याच विमानतळापेक्षा मोठे विमानतळ हे पुणे शहर-जिल्ह्याच्या वाढत्या व्यापानुसार आवश्यक असल्याने छोट्या विमानतळाचा प्रस्ताव केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाने  नाकारला हे जेष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांना ठाऊक आहे . असे असताना  वळसे पाटीलांना हे ठाऊक नाही म्हणजे हा आमदार डोक्यावर पडलाय ",असे मला वाटतेय असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. 

दरम्यान पाबळ-केंदूर भागातील रेल्वे खासदारांनी दूस-या भागात वळविल्याच्या माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या टिकेबद्दल ते म्हणाले की," पोपटरावांना काय-किती समजते हेच मला समजत नाही. कारण ज्यांना फक्त आपल्या कुटुंबाच्या स्वार्थाचे राजकारण कळते त्यांना हे समजायला हवे की, पुणे-नाशिक रेल्वेच्या पहिल्या सर्व्हेपासून पुढील प्रत्येक सर्व्हेला मी सुरवात करुन दिलेली आहे. मी कधीच पाबळ-निरगुडसर मार्गाबाबत विरोध केलेला नाही. उलट रेल्वे ही केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येकी ५० टक्के समभागाची स्वतंत्र कंपनी असल्याने त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी पाबळ मार्ग टाळला होता. मात्र आपण रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंना एप्रिल २०१७ ला पत्र देवून या मार्गाची पुन्हा मागणी केलेली असून त्यावर कार्यवाही सुरूही आहे. "

 एसईझेड प्रकल्प रद्द केल्याचे वक्तव्यही हास्यास्पद असल्याचेही सांगून ते पुढे म्हणाले ," खेड-एसईझेड प्रकल्प रद्द झाला नाही तर त्याचे धोरण बदलून इंडस्ट्रियल पार्क धोरण केंद्राने सन २०१३ मध्ये राबविले आणि हा निर्णय राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व तत्कालीन अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्यासह सहा सदस्यांच्या समितीने सन २०१३ मध्ये घेतला. त्यामुळे वळसे पाटलांनी कुणा टिंगु-मुंगू कार्यकर्त्याला पुढे करुन बोलू नये. मनगटात ताकद असेल कुणा टिंगु-मुंगू कार्यकर्त्याच्या तोंडून बोलण्यापेक्षा वळसे पाटलांनी आता स्वत: अभ्यास करुन समोर यावे. " 

 दरम्यान स्वत:च्या मेहुण्याच्या पराग कारखान्यासाठी आपण पूर्ण क्षमता वापरुन उभ्या केलेल्या भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याची मशिनरी व मनुष्यबळ दोन्हीही वापरल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

 

संबंधित लेख