आढळराव यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती

आढळराव यांच्यावर शिवसेना नेतृत्त्वाचा विश्वास कायम!
आढळराव यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती

पुणे : शिवसेनेच्या उपनेतेपदी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती झाली आहे. शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत आज झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारंसघात आढळराव यांचा पराभव झाला. तरी पक्षाने त्यांना उपनेतेपद देऊन संघटनेतील मान कायम ठेवला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या वेळी आढळराव यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे इतर नेते या वेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com