Additional Commissioner Beaten up in Pune Corporation | Sarkarnama

पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तांना महापौरांसमोरच बेदम मारहाण ; महापालिकेतील घटना

मंगेश कोळपकर
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

पुणे : जलपर्णी हटवण्याच्या गैरव्यवहाराबाबत विचारणा करताना नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांकडून अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात बेदम मारहाण केली जाण्याची धक्कादायक घटना महापालिकेत सोमवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडली.

जलपर्णी गैरव्यवहारात भाजपचे पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांचा सहभाग असल्याचे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेसने महापौरांच्या दालनात सोमवारी दुपारी आंदोलन सुरू केले. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त निंबाळकर तेथे होते. नगरसेवक अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर यांनी निंबाळकरांना काही प्रश्‍न विचारले. तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तरांनी धंगेकर, शिंदे यांचे समाधान झाले नाही. त्यांच्यात वादविवाद झाले. त्यावेळी उपस्थित नगरसेवकांच्या काही कार्यकर्त्यांनी महापौरांसमोरच निंबाळकर यांना बेदम मारहाण केली. या प्रकाराने महापालिकेत खळबळ उडाली आहे. पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. अजूनही गोंधळ सुरू आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख