Ad. Sachin Patwardhan birthday | Sarkarnama

वाढदिवस : अॅड. सचिन पटवर्धन 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 मे 2017

अॅड. सचिन पटवर्धन यांची पिंपरी-चिंचवड भाजपचे जाणते व अभ्यासू पदाधिकारी म्हणून ओळख आहे.

अॅड. सचिन पटवर्धन यांची पिंपरी-चिंचवड भाजपचे जाणते व अभ्यासू पदाधिकारी म्हणून ओळख आहे. त्यांच्या रूपाने युती शासन राज्यात सत्तेवर आल्यानंतर उद्योगनगरीला पहिला लाल दिवा मिळाला होता. राज्यस्तरीय लेखा समितीचे ते अध्यक्ष आहेत. तत्पूर्वी त्यांनी शहर भाजपचे सरचिटणीस, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, एनजीओ सेल अध्यक्ष, सहकार आघाडी अध्यक्ष अशी पदेही 
भुषविलेली आहेत. त्यानंतर राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेल्या लेखा समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. शहरात असा दर्जा असलेले ते एकमेव पदाधिकारी आहेत. 

संबंधित लेख