आजचा वाढदिवस : अॅड. देवयानी डोणगांवकर, जिल्हा परिषद अध्यक्षा, औरंगाबाद 

आजचा वाढदिवस : अॅड. देवयानी डोणगांवकर, जिल्हा परिषद अध्यक्षा, औरंगाबाद 

शिवसेनेच्या जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगांवकर यांचा आज (ता. 20) वाढदिवस. जळगावच्या भामरे या राजकीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. 24 जानेवारी 1999 रोजी त्यांचा विवाह कॉंग्रेसचे माजी खासदार व नेते स्व. साहेबराव पाटील डोणगांवकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील डोणगांवकर यांच्याशी झाला.

औरंगाबाद : शिवसेनेच्या जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगांवकर यांचा आज (ता. 20) वाढदिवस. जळगावच्या भामरे या राजकीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. 24 जानेवारी 1999 रोजी त्यांचा विवाह कॉंग्रेसचे माजी खासदार व नेते स्व. साहेबराव पाटील डोणगांवकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील डोणगांवकर यांच्याशी झाला. 

माहेर आणि सासरी देखील घरात राजकीय वातावरण असल्याने गेल्यावर्षी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत देवयानी डोणगांवकर गंगापूर तालुक्‍यातील सावंगी गटातून शिवसेनेकडून निवडूण आल्या. त्यानंतर पक्षाने त्यांना थेट जिल्हा परिषद अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि त्या विजयी झाल्या. 

सासरे माजी खासदार, सासू इंदुमती डोणगांवकर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष, तर पती कृष्णा पाटील डोणगांवकर यांनी विधानसभेची निवडणूक लढवलेली. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख म्हणून देखील ते सक्रीय राजकारणात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com