अभिनेते विश्‍वजित वाजतगाजत भाजपमध्ये

पुकारता चला हूं मै, ना झटको जुल्फ से पानी, फिर मिलोगे कभी इस बात का वादा कर लो, यासारख्या प्रसिद्ध गीतांचे नायक व साठच्या दशकातील बॉलिवूडचे चित्रपटस्टार विश्‍वजित ऊर्फ विश्‍वजित मुखर्जी यांनी आज दिल्लीतील मुख्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला.
अभिनेते विश्‍वजित वाजतगाजत भाजपमध्ये

नवी दिल्ली : पुकारता चला हूं मै, ना झटको जुल्फ से पानी, फिर मिलोगे कभी इस बात का वादा कर लो, यासारख्या प्रसिद्ध गीतांचे नायक व साठच्या दशकातील बॉलिवूडचे चित्रपटस्टार विश्‍वजित ऊर्फ विश्‍वजित मुखर्जी यांनी आज दिल्लीतील मुख्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला.

ज्या भाजपने 75 वर्षांची फूटपट्टी लावून मोदी राजवटीत लालकृष्ण अडवानींसारख्या नेत्यांना मौनात ढकलले त्याच भाजपने 82 वर्षांचे विश्‍वजित यांचा भाजप प्रवेश वाजतगाजत साजरा केला.

बॅनर्जींच्या हातून पश्‍चिम बंगाल हिसकावून घेण्यास भाजप नेतृत्वाने सर्व शक्ती, तपास यंत्रणा व जोर लावला आहे. येथे 2014 मधील 2 जागांवरून (16.8 टक्के मते) आगामी 2019 निवडणुकीमध्ये 42 पैकी किमान 20 ते 23 लोकसभा जागांवर जिंकण्याची भाजपची महत्त्वाकांक्षा आहे. त्यातूनच यापूर्वी मौसमी चॅटर्जी व आता विश्‍वजित यांना लाल गालीचा अंथरण्यात आल्याचे स्पष्ट आहे. भाजपचे मध्य प्रदेशाचे प्रभारी कैलास विजयवर्गीय व मुकूल रॉय यांच्या उपस्थितीत विश्‍वजित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com