actor ramdas aathawale | Sarkarnama

"अभिनेते' रामदास आठवले यांना पुरस्कार ! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 जुलै 2017

"मुलगी वाचवा देश वाचवा' या विषयावर आधारित असलेल्या कन्यारत्नने पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली आहे. स्रीभ्रुणहत्या थांबाव्यात, मुलींचे घटत चाललेले प्रमाण, महिला अत्याचार हे विषयही चित्रपटात हाताळले आहेत. 
-शिवाजी दोलताडे (दिग्दर्शक) 
 

पुणे : आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिनय केलेल्या कन्यारत्न चित्रपटाला एन आय एफ एफ दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आठवले यांचा "बेस्ट गेस्ट ऍपीरियन्स'ने सन्मान करण्यात आला. 

कन्यारत्न या चित्रपटाला बेस्ट फिल्मचा पुरस्कार प्रदन करण्यात आला. या चित्रपटात प्रथमच मुख्यमंत्र्याची भुमिका साकारत असलेले केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांना "बेस्ट गेस्ट ऍपीरियन्स' ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेत्री सिया पाटील यांना"बेस्ट ऍक्‍टरेस' व अदिती सारंगधर यांना "बेस्ट सपोर्टिंग ऍक्‍टरेस' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला मकरंद अनासपुरे,महेश कोठारे, विक्रम गोखले, निशिगंधा वाड , व्ही. शातांराम , दिग्दर्शक शिवाजी दोलताडे, मुकेश कन्हेरी, मल्हारी गायकवाड, साईनाथ जावळकर उपस्थित होते. 
 

संबंधित लेख