Actor Prakash Raj to contest loksabha | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

'सिंघम' फेम 'दबंग' अभिनेता प्रकाश राज लोकसभा लढवणार

सरकारनामा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

.

नवी दिल्ली :  प्रसिद्ध चित्रपट अभिनेता प्रकाश राज यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. प्रकाश राज अपक्ष निवडणूक लढवणार आहे.

प्रकाश राज यांनी अद्याप आपला लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघ निश्‍चित केलेला नाही. या संदर्भात प्रकाश राज यांनी मंगळवारी रात्री ट्विट करून ही घोषणा केली आहे. 'अबकी बार जनता की सरकार' अशी घोषणाही प्रकाश राज यांनी ट्विटरवर केली आहे.

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात सातत्याने टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे आपल्याला हिंदी चित्रपटात काम मिळणे बंद झाले आहे, असा आरोपही त्यांनी अलीकडे केला होता.

कन्नड, तमीळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटात प्रकाश राज यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. हिंदीमध्ये सिंघम आणि दबंग-2 या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजलेल्या आहेत.

संबंधित लेख