नगरमध्ये वाळू तस्करांविरोधात कलेक्टरांचा "ऍक्‍शन प्लॅन' : मुसक्‍या आवळण्यासाठी कठोर कारवाई 

नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात वाळू तस्करांनी महसूल पथकावर हल्ला केला होता. त्याचा निषेध म्हणून राजपत्रित अधिकारी आणि महसूल कर्मचारी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.
rahul dwivedi
rahul dwivedi

नगर : जिल्ह्यातील वाढत्या बेकायदेशीर वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी "अॅक्शन प्लॅन' तयार करण्यात आला असून, विविध विभागांच्या एकत्रित प्रयत्नातून वाळू तस्कराच्या मुसक्‍या आवळण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वाळू तस्करीचा बिमोड करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.
 
संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात द्विवेदी यांनी बैठक घेतली. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीस पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक घनश्‍याम पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे व मनीष कलवानिया, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, मुख्य सरकारी वकील सतीश पाटील, मुख्य शासकीय संचालक (विधी) आनंद नरखेडकर, वरिष्ठ उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर आदी उपस्थित होते.
 
बैठकीत वाळू तस्करी संदर्भातील सर्व घटनांसंदर्भात महसूल व पोलीस यंत्रणांकडून माहिती घेतली. बैठकीत आरटीओ विभागाच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून रात्रीच्या वेळी बिगर नंबर प्लेटच्या वाहनांतून होणारी वाळू वाहतुकीवर कारवाई होत नसल्याचे सांगितले. महसूल पथकांनी वाळूतस्करांची आणलेली वाहने चोरीला जातात, वाळू तस्करी संदर्भातील गुन्हे नोंदविण्यास विलंब होतो, अशा तक्रारी मांडण्यात आल्या. महसूल कर्मचारी संघटनेचे भाऊसाहेब डमाळे, तहसिलदार सुधीर पाटील, अनिल दौंडे, सुभाष दळवी, भारती सागरे, महेंद्र माळी, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, अर्चना नष्टे, तेजस चव्हाण, उज्वला गाडेकर यांनी वाळू तस्करी संदर्भातील कारवाईसाठी येत असलेल्या अडचणी सांगितल्या. 


"वाळू तस्करी संदर्भात मोक्का, एमपीडीए सारख्या कायद्यान्वये गुन्हे दाखल करावेत. अशा गुन्ह्यात वारंवार सहभागी असणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करावी. वाळू तस्करीच्या घटनांत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करताना विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नव्याने झालेल्या सुधारित शासकीय कर्मचारी हल्ला कायदा तसेच शासकीय कामकाजात अडथळा या कायद्यानुसार वाळू तस्करी प्रकरणात गुन्हे दाखल करावेत. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून वाळू तस्करीच्या मुसक्‍या आवळ्या जातील,'' असे द्विवेदी यांनी सांगितले. 

सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून वाळू तस्करीचा बिमोड केला जाईल. बेकायदेशीर वाळू उत्खननासाठी कुप्रसिद्ध असलेल्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून छापे टाकले जातील. वाळू उत्खननास पाठबळ देणाऱ्या व्यक्तींवर लक्ष केंद्रीत करून आणि महसूल व पोलिसांचे एकत्रित पथके तयार करून संयुक्त कारवाई केली जाईल, असे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com