action on chavhan brothers in shirur tahsildar issue | Sarkarnama

गाडीत औटी नव्हते, ढोकसांगवीचे चव्हाण बंधू होते; त्यांनीच केला तहसिलदारांचा पाठलाग

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

शिरुरचे तहसिलदार रणजित भोसले यांच्या गाडीचा पाठलाग करणारी गाडी पारनेर (जि. अहमदनगर) येथील असलीतरी पाठलाग करणारे शिरुर तालुक्‍यातील ढोकसांगवी येथील सख्खे भाऊ असल्याचे निष्पन्न झाले आहे.

शिक्रापूर (पुणे) : शिरुरचे तहसिलदार रणजित भोसले यांच्या गाडीचा पाठलाग करणारी गाडी पारनेर (जि. अहमदनगर) येथील असलीतरी पाठलाग करणारे शिरुर तालुक्‍यातील ढोकसांगवी येथील सख्खे भाऊ असल्याचे निष्पन्न झाले आहे.

संजय चव्हाण व बाळासाहेब चव्हाण अशी नावे असणाऱ्या या दोघांवर आज प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. 

रविवारी शिरुरचे तहसिलदार रणजित भोसले यांच्या गाडीचा पाठलाग करणारी इनोव्हा गाडी शिक्रापूर पोलिसांनी नंबरवरुन लगेच ओळखली व गाडीमालक अभय बन्सी औटी (रा.पारनेर, ता.पारनेर, जि.अहमदनगर) यांच्यासह गाडीत पाठलाग करतेवेळी असलेले संजय मुरलीधर चव्हाण व बाळासाहेब मुरलीधर चव्हाण (दोघेही रा. ढोकसांगवी, ता.शिरूर) यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई आज केली. 

दोघांनाही शिक्रापूर पोलिसांनी आज सकाळीच ताब्यात घेवून शिक्रापूर पोलिस स्टेशनला हजर केले. दोघांवरही प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून शिरुर तहसिलदारांपुढे हजर करुन अशा पध्दतीचा गुन्हा पुन्हा न करण्याबाबत लेखी स्वरुपात लिहून घेतल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी दिली . 

दरम्यान वरील प्रकरणात आपल्यावर ठेवली गेलेली पाळत ही बेकायदा वाळू व्यावसायिकांच्या काही जणांनी मिळून ठेवल्याची शक्‍यता असल्याची प्रतिक्रिया श्री भोसले यांनी दिली. 

संबंधित लेख