accused in bidre murder having lunch with girlfriend | Sarkarnama

अश्विनी बिद्रे खुनातील आरोपी महेश फळणीकरचे मैत्रिणीसोबत प्रीतीभोजन

दिनेश पिसाट
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

अलिबाग : पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे खून प्रकरणातील आरोपी महेश फळणीकर हा आपल्या मैत्रिणी सोबत स्नेह भोजन करीत असल्याचा व्हिडीओ बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे. फळणीकर याला न्यायालयात साक्षीला आणल्या नंतर परत नेहताना त्याने पोलिसांच्या सिक्युरिटीत हे प्रीतीभोजन केल्याचा आरोप अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केला आहे.

अलिबाग : पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे खून प्रकरणातील आरोपी महेश फळणीकर हा आपल्या मैत्रिणी सोबत स्नेह भोजन करीत असल्याचा व्हिडीओ बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे. फळणीकर याला न्यायालयात साक्षीला आणल्या नंतर परत नेहताना त्याने पोलिसांच्या सिक्युरिटीत हे प्रीतीभोजन केल्याचा आरोप अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केला आहे.

खून प्रकरणातील किंवा इतर गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयात नेहताना किंवा पुन्हा तुरुंगात आणताना पोलीस पार्ट्यांसाठी काही नियम केले आहेत मात्र हे नियम धाब्यावर बसवून पोलीस कसे बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपी महेश फळणीकर याच्यावर मेहेरबान झालेले आहेत हे राजू गोरे यांनी व्हायरल केलेल्या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळत आहे . फळणीकर याला न्यायालयात नेताना त्याची मैत्रीण भेटायला आली या वेळी या दोघांनी एका शेड खाली बसून भोजनाचा आनंद घेतला मैत्रिणीने आणलेल्या डब्यात आरोपीच्या आवडत्या वस्तू त्या डब्यात होत्या त्या वेळी न्यायालयात नेहणारे पोलीस मात्र आरामात बसून गप्पा मारत असल्याचे ह्या व्हिडिओत दिसत आहेत.

पोलिस हे प्रथमपासूनच आरोपींना झुकते माप देत असल्याचा आरोप गोरे यांनी केला. या खुनाच्या गुन्ह्याची दखल घेण्यापासून ते आरोपींवर कारवाई होण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. पऴणीकर हा मुख्य आरोपी पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरचा बालपणीचा मित्र आहे. त्याने या खूनात भूमिका बजावल्याचा आरोप आहे.  

अश्‍विनी बिद्रे-गोरे दोन वर्षांपूर्वी नवी मुंबईतील कळंबोली येथून बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या बेपत्ता होण्यात कुरुंदकरचा हात आहे, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. पोलिस सेवेत आल्यावर त्यांची पहिली नियुक्ती पुणे आणि नंतर सांगलीत झाली होती. त्या वेळी त्यांची कुरुंदकरशी ओळख झाली होती. 

कळंबोलीत नेमणूक झाल्यावर त्या या ठिकाणी आल्या, मात्र रुजू झाल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी तपास केल्यावर त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले. त्यांच्या संगणकातून काही महत्त्वाचे पुरावेही पोलिसांना सापडले होते. या प्रकरणाचा तपास जलदगतीने करावा, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात केली होती. या प्रकरणाचा तपास गांभीर्याने करून खटला एका वर्षात निकाली काढावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 
 

संबंधित लेख