acb department | Sarkarnama

जळगावच्या कारागृह अधीक्षकांसह कॉन्स्टेबलला लाच घेताना अटक

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 मे 2017

जळगाव : जळगाव जिल्हा कारागृहाचे अधीक्षक डी..टी.डाबेराव आणि पोलिस शिपाई बापू आमले यांना अवघ्या दोन हजार रुपयांची लाच घेताना आज जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पथकाने अटक केली. ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक पराग सोनवणे आणि त्यांच्या पथकाने केली. 

एका कैद्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्याच्या परवानगीचा व्यवहार तीन हजार रुपयात ठरला होता. कैद्याला रुग्णालयात पाठवायचे होते.

यासाठी त्याच्या नातेवाइकाला डाबेराव यांनी बंगल्यावर दोन हजार रुपये देण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार संबंधित नातेवाइकाने जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती व त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून आज सकाळी आठ वाजता जळगाव जिल्हा कारागृहाचे अधीक्षक डाबेराव आणि त्यांचा कॉन्स्टेबल आमले यांना हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले व त्यांना अटक करण्यात आली, ही कारवाई लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक पराग सोनवणे आणि त्यांच्या पथकाने केली. 
 
संबंधित लेख