about nagar south seat today dicision | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

नगर दक्षिणबाबत आज फैसला ? 

मुरलीधर कराळे 
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

नगर ः लोकसभेची नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीकडे असताना कॉंग्रेसलाही ती जागा डॉ. सुजय विखे यांच्यासाठी हवी आहे. मात्र जागाबदलाबाबत राष्ट्रवादीकडून अद्याप काहीच स्पष्ट झाले नाही. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आज (रविवारी) बैठक होणार आहे. 

या जागेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुकांनी मोर्चेबांधणी केले असली, तरी ती जागा राष्ट्रवादीकडेच ठेवायची, की कॉग्रेसला सोडायची, याबाबत आज चर्चा होणार असल्याचे समजते. 

नगर ः लोकसभेची नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीकडे असताना कॉंग्रेसलाही ती जागा डॉ. सुजय विखे यांच्यासाठी हवी आहे. मात्र जागाबदलाबाबत राष्ट्रवादीकडून अद्याप काहीच स्पष्ट झाले नाही. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आज (रविवारी) बैठक होणार आहे. 

या जागेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुकांनी मोर्चेबांधणी केले असली, तरी ती जागा राष्ट्रवादीकडेच ठेवायची, की कॉग्रेसला सोडायची, याबाबत आज चर्चा होणार असल्याचे समजते. 

दक्षिणेतून उमेदवारी करण्यासाठी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे प्रशांत गडाख, माजी आमदार दादा कळमकर, माजी आमदार नरेंद्र घुले हे इच्छुक असल्याचे बोलले जाते. खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा दौऱ्यात नुकतेच या विषयाला पुन्हा स्पर्ष करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस ही जागा सोडणार नसल्याचा पुनरुच्चार केला होता. पण शरद पवार व सोनिया गांधी याबाबत लवकरच निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले होते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनीही यापूर्वी आपली भूमिका स्पष्ट करीत ही जागा राष्ट्रवादीलाच राहिल, असे सांगितले होते. पण अंतीम निर्णय शरद पवार घेणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

दरम्यान, ही जागा लढविण्यास राष्ट्रवादीचे अनेकजण सरसावले आहेत. ऍड. प्रताप ढाकणे यांनी तर यापूर्वीच जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढविला आहे. शरद पवार यांचे स्नेही व शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे नेते यशवंतराव गडाख यांची नुकतीच खासदार सुप्रिया सुळे यांनी घरी जावून भेट घेतली. या वेळी प्रशांत गडाख उपस्थित होते. गडाख व पवार कुटुंबियांचे अत्यंत जुने संबंध आहेत. त्यामुळे ऐनवेळी त्यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते. माजी आमदार शंकरराव गडाख नेवासे मतदारसंघातून क्रांतिकारी पक्षाच्या झेंड्याखाली निवडणूक लढवितील. असे झाले, तर गडाख कुटुंबातील एकाला विधानसभेची व दुसऱ्याला लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. 

माजी आमदार दादा कळमकर, माजी आमदार नरेंद्र घुले हेही लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले जाते. या स्पर्धेत आता कोण बाजी मारणार की कॉंग्रेसला जागा सोडून स्पर्धाच संपुष्टात आणणार, याचे संकेत आज होणाऱ्या बैठकित मिळणार आहेत. त्यामुळे या बैठकिकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. 

राष्ट्रवादीच्या नेत्यांना हवी उमेदवारी 
लोकसभेची जागा कॉंग्रेसला सोडण्यासाठी राष्ट्रवादीचे स्थानिक पातळीवरील नेते कार्यकर्ते फारसे उत्सुक नाहीत. पक्षातील नेत्यांनीच ही जागा लढवावी, असे कार्यकर्त्यांना वाटते. त्यामुळे रविवारी होणाऱ्या बैठकित राष्ट्रवादीचे नेते आपली भूमिकाही स्पष्ट करणार असल्याचे समजते. 

साहेबांनी बोलावले, आता पाहू काय होते ः ऍड. प्रताप ढाकणे 
मुंबई येथे आज राष्ट्रवादी कॉंग्रेसची महत्त्वाची बैठक होत आहे. त्यामध्ये लोकसभेच्या उमेदवारीबाबत आढावा घेण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाचे पदाधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत. या जागेबाबत अद्याप कोणालाच काहीच माहिती नाही, साहेबांनी बोलावले आहे, आता पाहू काय होते ते, असे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ऍड. प्रताप ढाकणे यांनी सरकारनामा शी बोलताना सांगितले. 

टॅग्स

संबंधित लेख