abhishek kalamkar story | Sarkarnama

निवडून येण्याची शक्यता असतानाही अभिषेक कळमकर लढणार नाहीत!

मुरलीधर कराळे
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

त्यांना पारनेर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी खुनावते काय, असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.

नगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी झाली सुरू झाली आहे. मात्र आपल्या प्रभागातून निवडून येण्याची शक्यता असतानाही महापालिकेची उमेदवारी करणार नसल्याचा निरोप माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी वरिष्ठांना दिला. कळमकर यांची महापालिका मैदानातून अचानक झालेली एक्झिट त्यांना पारनेर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी खुनावते काय, असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.

राष्ट्रवादी कांग्रेसतर्फे महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी होणार आहेत. त्यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी मागायची, हे धोरण धरले आहे. अशा परिस्थितीत माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी ऐनवेळी आपण उमेदवारी करणार नसल्याचे पक्ष श्रेष्ठींना कळवून नगरसेवकपदासाठी उमेदवारी करणार नसल्याचे स्पष्ट केले. प्रत्यक्षात  महापौर असताना त्यांनी केलेल्या कामांच्या जोरावर त्यांना उमेदवारी मिळविणे व निवडून येणे सोपे झाले असते, मात्र त्यांनी उमेदवारीच करणार नसल्याचे जाहीर केले. त्यांनी केलेल्या जाहीर वक्तव्यामुळे पारनेरमधील विधानसभेच्या उमेदवारीमध्ये आणखी एक नाव वाढल्याचे मानले जाते.  

संबंधित लेख