Abdul Sattar angry with Aurangabad collector Uday Chaudhari | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

विरोधी आमदारांना भेटू नका असे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश आहेत का? -अब्दुल सत्तार 

सरकारनामा
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

जिल्हाधिकाऱ्यांनी आमचा नाही तर सव्वातीन लाख लोकांनी निवडून  दिलेल्या लोकप्रतिनिधीचा आणि लोकशाहीचा अपमान केला आहे. विधानसभेत आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे.

- अब्दुल सत्तार 

औरंगाबादः लोकांचे गाऱ्हाणे घेऊन आलेल्या लोकप्रतिनिधीशी कसे वागावे याचा विसर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना पडला आहे का? असा संतप्त सवाल कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना केला. 

निरपराधांवर होणाऱ्या पोलीस अत्याचाराविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देण्यासाठी कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा आपण मिटिंगमध्ये असल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी या शिष्टमंडळाला ताटकळत ठेवले. लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी कलेक्‍टर साहेबांना वेळ नाही का? हा आमचा नाही तर लोकशाहीचा अपमान असल्याची टिका देखील सत्तार यांनी केली. 

सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील अजिंठा गावच्या महिला सरपंच व कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या विरोधात दोन दिवसांपुर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला होता. 

या कारवाईच्या विरोधात आज (ता.8) कॉंग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. दहा हजारांवर नागरिक व कॉंग्रेस कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते असा दावा करण्यात येत आहे. आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झाबंड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, नामदेव पवार, नितीन पाटील यांच्यासह तेरा पदाधिकाऱ्यांचे मंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी दुपारी त्यांच्या दालनात गेले होते. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो मोर्चेकरी उभे असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडी निवेदन स्वीकारावे अशी भूमिका सत्तार व त्यांच्या शिष्टमंडळाने घेतली. जिल्हाधिकारी उदय चौधरी त्यांच्या दालनात नसल्यामुळे बराच वेळ वाट पाहिल्यानंतर ते आले. परंतु प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि छायाचित्रकारांना पाहून ते भडकले आणि यांना बाहेर काढा, असे फर्मान सोडत त्यांनी निवेदन देतांनाचे छायाचित्र काढण्यास मज्जाव केल्याचे सत्तार यांनी सांगितले. 

मोर्चामध्ये हजारो लोक आणि भेटण्यासाठी लोकप्रतिनिधी आले असतांना जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला ताटकळत ठेवले भेट दिली नाही. किती महत्वाचे काम असले तरी लोकप्रतिनिधींना योग्य मान सन्मान देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्या असा सरकारचा जीआर आहे. कलेक्‍टर साहेबांना याचा विसर पडला का? की विरोधी आमदारांना भेटू नका असा गुप्त आदेश या सरकारने दिला आहे? असा सवाल देखील सत्तार यांनी केला. 

 

संबंधित लेख