abdul sattar and palika | Sarkarnama

"आमदारा आपल्या दारी ', सत्तार यांच्याकडून समस्यांचा " ऑन दी स्पॉट ' निपटारा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

औरंगाबाद : सिल्लोड नगरपालिका निवडणुका महिनाभरावर येऊन ठेपलेल्या असतांना आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून शहरात "आमदार आपल्या दारी' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या "ऑन दी स्पॉट' सोडवल्या जात असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे सत्तार यांच्याकडून नगरपालिका निवडणुकीच्या महिनाभरआधी अशा प्रकारची मोहीम दर पाच वर्षांनी राबवली जाते. 

औरंगाबाद : सिल्लोड नगरपालिका निवडणुका महिनाभरावर येऊन ठेपलेल्या असतांना आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून शहरात "आमदार आपल्या दारी' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या "ऑन दी स्पॉट' सोडवल्या जात असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे सत्तार यांच्याकडून नगरपालिका निवडणुकीच्या महिनाभरआधी अशा प्रकारची मोहीम दर पाच वर्षांनी राबवली जाते. 

गेल्या पंचवीस वर्षांपासून सिल्लोड नगरपालिकेवर कॉंग्रेसची पर्यायाने आमदार अब्दुल सत्तार यांची एकहाती सत्ता राहिली आहे. नगरपालिका निवडणुकीतील सत्तेच्या जोरावरच त्यांनी जिल्हा आणि राज्याच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केल्याची चर्चा आहे. ज्या नगरपालिकेपासून सत्तार यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली, त्याच नगरपालिकेतून त्यांनी आता आपले राजकीय वारसदार म्हणून पुत्र समीर सत्तार यांना बळ देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. समीर सत्तार हे सध्या नगराध्यक्ष आहेत. 

येत्या जानेवरीत म्हणेज नवीन वर्षात सिल्लोड नगरपालिकेच्या 26 नगरसेवक व नगराध्यक्ष अशा 27 जागांसाठी मतदान होणार आहे. भाजप, एमआयएम-वंचित आघाडीमुळे येणारी निवडणुक आपल्यासाठी सोपी नाही याची जाणीव झाल्यामुळेच मतदारांमध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी राहू नये याची काळजी अब्दुल सत्तार घेतांना दिसत आहे. त्यासाठी त्यांनी अगदी निवडणुकीच्या एक महिनाआधी " आमदार आपल्या दारी' ही मोहिम हाती घेत शहर आणि त्याला लागून असलेल्या वाड्या, तांड्यांना भेट देणे सुरू केले आहे. रोज दहा बारा किलोमीट पायी चालत सत्तार घरोघरी जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेत आहेत. 

केवळ समस्या ऐकूनच ते थांबत नाहीत, तर ज्या विभागाशी ती निगडीत आहे, त्या संबंधित अधिकाऱ्याला जागेवरच ती सोडवण्याची सूचना करत आहेत. ऑन दी स्पॉट समस्यांचा निपटारा करण्याची सत्तार यांची ही पध्दत शहरात बरीच लोकप्रिय ठरत आहे. आता या जोगवरच सोडवलेल्या समस्याचा फायदा त्यांना निवडणूकीत कितपत होतो हे लवकरच स्पष्ट होईल. या मोहिमे संदर्भात अब्दुल सत्तार यांना विचारले असता ते म्हणाले, मी दरवर्षी शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी "आमदार आपल्या दारी' मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जातो. माझ्या सोबत नगरपालिका, महावितरण, आरोग्य, शिक्षण अशा सगळ्याच विभागाचे अधिकारी देखील असतात. जेणेकरून एखाद्या व्यक्तीने सांगितलेली अडचण जागेवरच सोडवता येईल. या मोहिमेचा मला निश्‍चितच फायदा होतो आणि जनतेशी थेट संवाद साधण्याची संधी देखील या निमित्ताने मिळते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख