Aap to contest 12 loksabha seats from Maharashtra | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

आप महाराष्ट्रात लोकसभेच्या बारा जागा लढवणार :राजेंद्र गौतम 

अनिल जमधडे 
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

आम आदमी पार्टीने आगामी निवडणूकीसाठी राज्यात जय्यत तयारी केली आहे. पक्ष स्वबळावर दहा ते बारा जागा लढणार. 

-ब्रिगेडीयार सुधीर सावंत

औरंगाबाद : आम आदमी पार्टीने आगामी निवडणूकीसाठी राज्यात जय्यत तयारी केली आहे. पक्ष स्वबळावर दहा ते बारा जागा लढणार असल्याची माहिती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडीयार सुधीर सावंत आणि दिल्लीचे सामाजीक न्यायमंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. भाजप सरकार हे उद्योजकांसाठी काम करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. 

आम आदमी पार्टीतर्फे महार रेजिमेंटच्या 77 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने शहरात आलेल्या राजेंद्र पाल गौतम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडून, देशात भाजपा सरकार उद्योजकांच्या बाजूने ठामपणे उभी आहे. उद्योजक हवी तशी धोरणे राबवून घेत आहेत. 

सरकारी शाळांचे खाजगीकरण करण्यात येत आहे. रुग्णसेवेची दुरावस्था झाली आहे. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षाच्या विकासात गोरगरीबांचा वाटा कुठे आहे. मतदान यंत्रामध्ये गडबड केली जाऊ शकते. सर्वच पक्षाने केलेल्या मागणीप्रमाणे निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरद्वारेच निवडणूका घ्याव्यात अशी मागणीही गौतम यांनी यावेळी केली. 

दिल्लीत आम आदमी पार्टीने राजकीय भ्रष्टाचार संपवला आहे. दिल्ली सरकार शिक्षणासाठी अर्थसंकल्पाच्या 24 तर आरोग्यासाठी 22 टक्के खर्च करत आहे. दिल्लीमध्ये दर्जेदार शिक्षण आणि पंचतारांकित आरोग्याच्या सुविधा दिल्या दिल्या जात असल्याचा दावा गौतम यांनी केला. आम आदमी पार्टीचा एकही मंत्री भ्रष्टाचार करत नाही, त्यामुळेच एक मॉडेल सरकार म्हणून दिल्ली सरकारकडे देशात पाहिले जात असल्याचे गौतम यांनी सांगितले.  

संबंधित लेख