aanna dange and cm | Sarkarnama

धनगर आरक्षण दिल्यास सरकार कोसळेल अशी मुख्यमंत्र्यांना भीती - अण्णा डांगे

सुशांत सांगवे
शनिवार, 29 डिसेंबर 2018

लातूर : राज्यात 19 आदिवासी आमदार आहेत. त्यांचा धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध आहे. ते नाराज होतील, ते सत्तेतून बाहेर पडतील आणि आपले सरकार कोसळेल अशी भीती मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळेच ते धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेत नसावेत, असा गौप्यस्फोट माजी मंत्री अण्णा डांगे यांनी येथे केला. 

लातूर : राज्यात 19 आदिवासी आमदार आहेत. त्यांचा धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध आहे. ते नाराज होतील, ते सत्तेतून बाहेर पडतील आणि आपले सरकार कोसळेल अशी भीती मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळेच ते धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेत नसावेत, असा गौप्यस्फोट माजी मंत्री अण्णा डांगे यांनी येथे केला. 

धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाज महासंघाची बैठक लातूरात शनिवारी घेण्यात आली. या बैठकीनंतर डांगे बोलत होते. " धनगर समाजाला आरक्षण देणार आहे. थोडं थांबा,' असे मुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत. पण " थोड थांबा म्हणजे किती काळ थांबा ?' साडेचार वर्षे आम्ही थांबलो. पण मुख्यमंत्र्यांनी अद्याप धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. त्यांनी आमचा विश्वासघात केला तर येणाऱ्या निवडणुकीत जनता सरकारचा विश्वासघात केल्याशिवाय राहणार नाही. 

डांगे म्हणाले, " आमचे सरकार आले तर धनगर समाजाला पहिल्याच बैठकीत आरक्षण देण्यात येईल,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत सांगितले होते. त्याप्रमाणे धनगर समाजाने त्यांना मते दिली. पण मुख्यमंत्र्यांनी अद्याप आपले आश्वासन पूर्ण केले नाही. साडेचार वर्षे झाली. धनगर समाजाला जाणून बुजून मागे ठेवले जात आहे. जे घटनेत आहे त्या घटकाला आरक्षण दिले जात नाही ; पण जे घटनेत नाही, त्याला ताकद दाखवल्यामुळे लगेच आरक्षण दिले जात आहे. राजा इतका उदार झाला आहे. त्याने आता आमच्या समस्याही सोडवायला हव्यात. अन्यथा आम्हीही मंत्र्यांना, आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही.' 

आम्हीही आकाश-पाताळ एक करू 
आरक्षणासाठी धनगर समाजाचे सर्व आमदार आठवडाभरात मुख्यमंत्र्यांचे भेट घेणार आहेत. या भेटीनंतर आंदोलनाची नेमकी रूपरेषा ठरवली जाणार आहे. आरक्षण न मिळाल्यास मराठा समाजाप्रमाणे आम्हीही आकाश-पाताळ एक करू, असा इशारा डांगे यांनी दिला. धनगर समाज साधा-भोळा आहे. त्याने सरकारवर विश्वास ठेवला आहे. तो सरकारने खोटा ठरवू नये. लोकसभेच्या निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारने धनगर आरक्षणाचा अंतिम निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले. 

 

संबंधित लेख