aaditya thakare metro | Sarkarnama

आदित्य ठाकरे यांचे यांचा कारशेडला विरोधच

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 जून 2017

मुंबई : आरेच्या हरित पट्ट्यात मुंबई मेट्रो -3 ची कारशेड उभारण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. त्याची बाजू मांडताना आज ट्‌विट्ट करून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही "आरे'ला "कारे' केले आहे. काल शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीत आरे कारशेड प्रस्ताव नामंजूर केला आहे. त्यामुळे भाजप सेनेत तणाव वाढत असताना या वादात युवा सेनाप्रमुखांनी उडी घेतली आहे. 

प्रस्ताव नाकारण्याचे समर्थन करताना आदित्य ठाकरे म्हणतात, पर्याय उपलब्ध असताना आरेच्या जागेतली झाडे आम्ही तोडू देणार नाही. मी मेट्रोचा पुरस्कार करतो. मेट्रोला पाठिंबा देतो. सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रोची गरज आहे. हे मला मान्य आहे. यापूर्वीच्या सरकारनेही हा मागणी मान्य केली आहे. परंतु यामुळे आरेचे जे नुकसान होणार आहे ते चुकीचे आहे. 

एका बाजूला सरकार पॅरीस कराराचा संबंध देवून हवामान बदलाच्या संकटाशी लढण्याची भाषा करते अन्‌ दुसऱ्या बाजूला आरेचे जंगल नष्ट करणार हा दुट्टपी पणा आहे. मला चिंता वाटते हे की आपली हवामानबद्दलाची वक्तव्ये फक्त वर्तमानपत्राच्या बातम्यासाठी, समाज माध्यमातील प्रचारासाठी राहू नये, अशी अपेक्षाही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. 

ठाकरे म्हणतात, मेट्रो महामंडळ अजूनही आरे वाचवू शकते. सार्वजनिक वाहतुकीसाठी झाडे तोडून जंगल नष्ट करणे हे चुकीचे आहे. पर्याय उपलब्ध आहेत. झाडे न तोडताही मेट्रो बनवता येईल असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 

संबंधित लेख