aaditya thakare | Sarkarnama

चार्टड विमानाच्या उड्डाणाला परवानगी नाकारली, आदित्य ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा रद्द

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 मे 2017

औरंगाबाद : रॅन्समवेअर व्हायरसचा धोका लक्षात घेता एअरपोर्ट ऍथॉरेटीने खासगी चार्टड विमानांच्या उड्डाणास तात्पुरती परवानगी नाकारल्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा उद्याचा (ता.17) औरंगाबाद दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. महापालिकेच्या वतीने शहरात सुरु असलेल्या विविध विकासकामांचे उद्‌घाटन, रस्त्यांचे भूमिपूजन व अनेक वास्तूंचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. या दौऱ्याची जय्यत तयारी शिवसेना व महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र अचानक दौरा रद्द झाल्याने शिवसैनिक व युवासैनिक नाराज झाले आहेत. 

महापालिकेच्या वतीने दलित वस्ती विकास कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकास कामांसह शिवाजीनगर येथील आदर्श रस्त्याच्या कामाचा शुभारंभ, आरोग्य केंद्राचे भूमिपूजन, आमदार, खासदार निधीतून झालेल्या विकासकामांचे लोकार्पण अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन 17 मे रोजी करण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील शिवसंपर्क मोहिमेच्या आढावा बैठकीस उद्धव ठाकरे यांच्या सोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार होते. मात्र तेव्हा देखील त्यांचा दौरा रद्द झाला होता. वर्षभराने आदित्य ठाकरे शहरात येणार असल्यामुळे शिवसैनिक व युवासैनिकांमध्ये उत्साह होता. परंतु चार्टड विमानाच्या उड्डाणाला परवानगी नाकारल्यामुळे त्यावर पाणी फिरले आहे. 

विमानतळांना दक्षतेचा इशारा 
रॅन्समवेअर व्हायरसचा हल्ला होऊ नये यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या सर्व खात्यांना इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बॅंका, विमानतळ संरक्षण यंत्रणा, हॉस्पिटल व शेअर बाजाराला दक्षतेचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार विमानतळ प्राधिकरणाने खासगी चार्टड विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातल्याचे कळते. 

संबंधित लेख