aaditya thackrey rangerover issue | Sarkarnama

आदित्य ठाकरेंची रेंजरोव्हर खड्ड्यांचा `सामना' करु शकली नाही! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

शिवसेना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रेंजरोव्हर गाडीचे टायर काल फुटले. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे हा प्रकार झाल्याची माहिती पुढे आली आहे. 

पुणे: शिवसेना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रेंजरोव्हर गाडीचे टायर काल फुटले. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे हा प्रकार झाल्याची माहिती पुढे आली आहे. 

आदित्य ठाकरे आपल्या दोन दिवसीय नाशिक दौऱ्यासाठी रात्री मुंबईहून निघाले होते. घोटीगावाजवळ महामार्गावर मोठे खड्डे असल्याने त्यातून जाताना टायर फुटले. त्यानंतर गाडी बदलून ठाकरे मुक्‍कामाच्या ठिकाणी रवाना झाले. दरम्यान, या प्रकारानंतर आपण सुखरुप असल्याचे ट्‌विट ठाकरे यांनी केले आहे. 

संबंधित लेख