महाआघाडीत 56 पक्ष, पण त्यांना नेता नाही : आदित्य

आमदार चंद्रदीप नरके यांचे पुत्र तसेच आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज, प्रा संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र यांनी शक्तीप्रदर्शन केले.
महाआघाडीत 56 पक्ष, पण त्यांना नेता नाही : आदित्य

कोल्हापूर : विमानसेवेची कनेक्‍टीव्ही कोल्हापुरच्या विकासाची दालने खुली करेल, असा विश्‍वास युवा सेनाप्रमूख आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

'आदित्य संवाद' कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी सायंकाळी तरूणांशी संवाद साधला. पेटाळा मैदानावर हा कार्यक्रम झाला. पावसाचे वातावरण नंतर वादळी वारे यामुळे कार्यक्रम होईल की नाही याची शंका होती. विजांचा कडकडाटातही तरूणांच्या सळसळत्या उत्साहात कार्यक्रम पार पडला. पंचगंगा प्रदूषणापासून सर्कीट बेंचपर्यंतच्या प्रश्‍नांना आदित्य यांनी हात घातला. 

23 एप्रिलला लोकसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. प्रत्येक मत हे महत्वाचे आहे. मतदान हे शस्त्र आहे. पाच वर्षे राजकारणी लोकांचे तुम्हाला ऐकावे लागते पण निवडणुकीवेळी तुमचे ऐकणे महत्वाचे आहे. तुमच्या मनातील गोष्टी मी निश्‍चितपणे दिल्लीला पोहचवेन. स्थानिक खासदार हा सत्ताधारी पक्षाचा नसला की अडचणी निर्माण होतात. केंद्र सरकारच्या विकासाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहचत नाही. येथेही राष्ट्रवादीचा खासदार असल्याने अडचणी निर्माण झाल्या. येथील विमानसेवेला अन्य शहरांची कनेक्‍टीव्ही नाही. नाईट लॅण्डींगची व्यवस्था नाही. कनेक्‍टीव्हीटी असेल तर आयटी, औद्योगिक विकास होऊ शकतो.  

ज्या महाआघाडीमध्ये 56 पक्ष आहेत पण या महाआघाडीला नेता नाही. साठ वर्षे देशाला खोटी आश्‍वासने देऊन ज्यांनी वाटोळे केले त्यांच्या हाती सत्ता देऊन काही उपयोग नाही. मजबूर नव्हे तर मजबूत सरकार व्हायचे असेल एनडीएला पर्याय नाही. 

रोहन घोरपडे, सलोनी शिंत्रे, विकी मगदूम, श्रद्धा सुर्वे यांना प्रश्‍न विचारण्याची संधी मिळाली. ऋषीकेश गुजर, पवन जाधव, हर्षल सुर्वे, मंजित माने, विहान सरनाईक, साईनाथ दुर्गे आदिंनी कार्यक्रमाचे संयोजन केले. 
 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com