Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News

ब्लॉग

अमोल कविटकर
पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची तुलना होणं स्वाभाविकच होतं. किंबहुना यापुढे आता ही तुलना मुख्य राजकीय प्रवाह असणार. मात्र आजचा निकाल म्हणजे मोदींचा पराभव आहे? की राहुल यांचा विजय? एवढ्यापुरताच मर्यादित नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधारी भाजपला पराभवाच्यानिमित्ताने अनेक कंगोरे धडकी भरायला लावणारे आहेत. देशाची सेमीफायनल म्हणून या... आणखी वाचा
प्रकाश पाटील 
ज्यांची वैचारिक बैठकच पक्की झालेली असते ती कदापी बदलने शक्‍यही नसते. शाहू फुले आंबेडकर यांना आदर्श मानणारी उत्तरप्रदेशातील ही रणरागिणी उजवीकडे वळलीच कशी हा प्रश्‍न तेथील जनतेला नेहमीच पडला. सावित्रीबाईंचा जीवनसंघर्ष थक्क करणारा आहे. सावित्रीबाईचा चेहरा देशातील महिलांना प्रेरणा देणारा आहे.  उत्तरप्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील हुसेनपूर मृदांगी या खेड्यात सावित्रीबाईंचा जन्म 1981 मध्ये झाला. त्यांचे वडील... आणखी वाचा
Vasundhara Pilot
मुकुंद लेले 
राजस्थानात भाजपची सत्ता जाणार तर काँग्रेसला अच्छे दिन येणार?     बरोबर वीस वर्षांपूर्वीचे हेच दिवस. आज त्याची आठवण होण्याचे कारणही तसेच आहे. विधानसभा निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी "सकाळ'चा प्रतिनिधी म्हणून प्रथमच राजस्थानात जाण्याची संधी मिळाली होती. केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आणि राजस्थानातही त्याच पक्षाची सत्ता, यामुळे या पक्षाचे नेते, कार्यकर्ते (अति) उत्साहात होते. भाजपचे ज्येष्ठ... आणखी वाचा
-अशोक सुरवसे
शिवसेना आणि भाजप यांच्‍यातले संबंध जगजाहीर झालेत. या दोन्‍ही पक्षातलं प्रेम 2014 च्‍या निवडणुकीवेळीच आटलंय. तरीही दोघांमध्‍ये 'कूलिंग ऑफ'चा काळ सुरु आहे. हा कालावधी कायद्यानं सहा महिन्‍यांचा असला तरी या दोघांमध्‍ये गेल्‍या साडेचार वर्षांपासून तो सुरु आहे. तो यापुढं राहणार नाही, हे शिवसेनेकडून गेल्‍या काही दिवसांपासून वारंवार सांगितलं गेलंय आणि आजही सांगितलं जातंय. तरीही आपण शिवसेनेच्‍या प्रेमात आहोत, असं भाजपही... आणखी वाचा