83-years-old-shivajirao-pandit-campaigns | Sarkarnama

गेवराईत ८३ वर्षीय शिवाजीराव पंडित प्रचारात 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 एप्रिल 2019

वयाची ८३ वर्षे पूर्ण केलेले शिवाजीराव पंडित आताही त्याच उत्साहाने राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांचा प्रचार करत आहेत. गेवराई तालुक्यात ते सहकाऱ्यांसह कॉर्नर बैठका, बैठका घेऊन शरद पवार यांना साथ देण्याचे आवाहन करत आहेत.

बीड : शेतकऱ्यांसाठी लाख मोलाचा पोशिंदा ठरलेले शेतकऱ्यांचे जाणता राजा शरद पवार यांच्या पाठिशी बीड जिल्हा नेहमी खंबीरपणे उभा राहिल्याचा इतिहास असून यंदाही त्याची पुनरावृत्ती होणार असल्याचा विश्वास माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांना आहे. 

सध्याचे सरकार असंवेदनशिल असून त्यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे, दुष्काळाचे कुठलेही सोयरसुतक नसल्याचा आरोपही पंडित यांनी केला आहे.

वयाची ८३ वर्षे पूर्ण केलेले माजी मंत्री शिवाजीराव पंडित राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ हिरीरीने सहभागी झाले आहेत. वास्तविक त्यांचे मोठे चिरंजीव पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित व कनिष्ठ चिरंजीव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित हे दोघेही गेवराई मतदारसंघात जोमाने प्रचार करत असताना शिवाजीराव पंडित यांनीही जुन्या तत्कालिन सहकाऱ्यांच्या माध्यमातून स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. 

मागच्या आठवड्यात त्यांनी गेवराई तालुक्यातील विविध गावांत छोटेखानी सभा, कॉर्नर बैठका आणि बैठका घेऊन बजरंग सोनवणे यांना विजयाचे आवाहन केले. 

संबंधित लेख