79 percent workers absent in Mantralya today | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

३१ डिसेंबर इफेक्ट : मंत्रालयात 71 टक्के कर्मचारी गैरहजर

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 31 डिसेंबर 2018

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांना नववर्षात सातव्या वेतन आयोगाची भेट मिळाली असून, तो आनंद द्विगुणित करण्यासाठी राज्य सरकारने दोन नैमितिक रजांचा बोनस जाहीर केल्याने आज मंत्रालयात जेमतेम 29 टक्‍के हजेरी होती. 71 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी नववर्षाच्या स्वागतासाठी घरी राहणेच पसंत केले. 

मंत्रालय इमारत आणि नवीन प्रशासकीय इमारतीत 29 टक्‍के कर्मचारी उपस्थितीत होते. डिसेंबर अखेरीला सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्या संपवण्याची लगबग असल्याने तसेही या मागील दोन आठवड्यात कर्मचाऱ्यांची मंत्रालयातील उपस्थिती जाणवण्या इतपत कमी होती. त्यातच दोन दिवसांपूर्वी सामान्य प्रशासन विभागाने 20 मार्च रोजी माटुंगा - दादर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे भरतीसंदर्भात विद्यार्थ्यांनी केलेल्या रेल रोको आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक विस्कळित झाली होती.

त्यामुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयात पोचणे शक्य झाले नव्हते. तसेच 3 जुलै रोजी अंधेरी रेल्वे स्थानकात पादचारी पूल कोसळल्याने वाहतूक सेवा विस्कळित झाली होती. या दोन दिवसाची नैमित्तिक रजा विभागाने जाहीर केली. त्याचा पुरेपूर लाभ कर्मचाऱ्यांनी आज घेतला. 

संबंधित लेख