नाशिक जिल्ह्यात ७६ तृतीयपंथी बजावणार मतदानाचा हक्क

नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मतदार जनजागृती मोहिमेत ७६ तृतीयपंथीनी मतदार होण्यासाठी तत्परता दर्शविली. नाशिक पश्‍चिम मतदार संघातून ६६ तृतीयपंथींना तर नांदगाव, मालेगाव, कळवण, नाशिक मध्य मतदार संघातून प्रत्येकी एक, मालेगाव मध्य दोन आणि येवला मतदार संघातून तीन असे तृतीयपंथी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
नाशिक जिल्ह्यात ७६ तृतीयपंथी बजावणार मतदानाचा हक्क

नाशिक : तृतीयपंथी म्हणून जन्म झाला कि, घरापासून तर सुशिक्षित समाजापर्यंत अपमानाचेच प्रसंग वाट्याला येतात. निसर्गतःच लाभलेलं हे वेगळेपण आई- वडिलांना देखील बऱ्याचदा पचनी पडत नाही, मात्र आगामी निवडणुकांमध्ये तृतीयपंथीना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात 76 तृतीयपंथी मतदान करतील.

नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मतदार जनजागृती मोहिमेत ७६ तृतीयपंथीनी मतदार होण्यासाठी तत्परता दर्शविली. नाशिक पश्‍चिम मतदार संघातून ६६ तृतीयपंथींना तर नांदगाव, मालेगाव, कळवण, नाशिक मध्य मतदार संघातून प्रत्येकी एक, मालेगाव मध्य दोन आणि येवला मतदार संघातून तीन असे तृतीयपंथी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

अप्रत्यक्षरीत्या रोजगाराचा हक्क नाकारलेला हा वर्ग मतदार राजाच्या पंगतीत बसल्याने रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड आदी सार्वजनिक ठिकाणी 'दुवा' देत पोट भरणाऱ्या या वर्गाच्या एक-एका मतांसाठी लोकप्रतिनिधी आपली शोधक बुद्धी पणाला लावताना दिसून येतील. शिवाय आता तिरस्काराऐवजी मानाचे पान मिळणार आहे. अर्थातच एरवी दुर्लक्षित म्हणवल्या जाणाऱ्या या वर्गाला निवडणूक काळात तरी महत्त्व मिळणार यात शंका नाही.

नाशिक जिल्ह्यात नोंदणी झालेला 76 आकडा समाधानकारक नाही. प्रत्यक्षात तृतीयपंथींचा आकडा हा मोठा असतांना दोन वर्षांपूर्वी माहितीच्या अधिकारात देशभरात फक्त पस्तीस हजार तृतीयपंथी असल्याची माहिती मला मिळाली होती. आगामी काळात नोंदणी झालेल्या व नोंदणी न झालेल्या तृतीयपंथींना मतदान प्रक्रियेत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - दिशा पिंकी शेख, तृतीयपंथी कवयित्री

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com