5 BJP mla from pune seconder for kovind | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

पुण्यातील पाच भाजप आमदार  रामनाथ कोविंद यांचे सूचक 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 20 जून 2017

महाराष्ट्रातील एकूण २५ आमदारांनी रामनाथ कोविंद यांच्या अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. देशभरातून १०० आमदार आणि १०० खासदार कोविंद यांचे अनुमोदक आणि सूचक असणार आहेत.

पुणे : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारी अर्जावर महाराष्ट्रातील भाजपच्या 25 आमदारांनी आज सूचक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या. पुण्यातील पाच आमदारांचा यात समावेश होता. 

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पुढील 23 जून रोजी कोविंद हे अर्ज दाखल करण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरू आहे. या अर्जावर अनुमोदक म्हणून 50 आमदार किंवा खासदार आणि सूचक म्हणूनही तितक्‍याच संख्येने आमदार किंवा खासदार सूचक म्हणून आवश्‍यक असतात. म्हणजे एका अर्जावर शंभर जणांच्या स्वाक्षऱ्या आवश्‍यक असतात. भाजपकडून चार अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक राज्यातील खासदार आणि आमदारांना आज दिल्लीत बोलविण्यात आले होते. महाराष्ट्रातील भाजप आमदारांनी सहप्रभारी राकेशसिंग यांच्या निवासस्थानी जाऊन या अर्जावर सह्या केल्या. 

पुण्यातून राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार बाळ भेगडे, भीमराव तापकीर, विजय काळे, महेश लांडगे हे पाच जण गेले होते. राज्याच्या इतर भागातूनही आमदार आले होते. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गट भाजपने या निवडणुकीसाठी सक्रिय केला आहे. यात राज्यमंत्री मुक्तार अब्बास नक्वी आणि सरचिटणीस भूपेंद्र यादव यांचा समावेश आहे. 

याबाबत बोलताना बाळ भेगडे म्हणाले की एक भाजपचे पहिल्यापासून काम करणारा एक कार्यकर्ता कोविंद यांच्या रूपाने प्रथमच राष्ट्रपती म्हणून निवडला जाणार आहे. अशा ऐतिहासिक क्षणात आपलाही खारीचा वाटा म्हणून सहभाग असणे, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. 

संबंधित लेख