| Sarkarnama

जळगावात मनसेचे माजी नगरसेवक संतोष पाटील गोळीबारात जखमी 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 31 डिसेंबर 2018

जळगाव महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर आज सकाळी गोळीबार करण्यात आला. यात ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगावातील सहयोग क्रिटीकल सेंटर येथे उपचार सुरू आहेत. भाजपच्या विदयमान नगरसेविका उषा पाटील यांचे ते पती आहेत. 

जळगाव : जळगाव महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर आज सकाळी गोळीबार करण्यात आला. यात ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगावातील सहयोग क्रिटीकल सेंटर येथे उपचार सुरू आहेत. भाजपच्या विदयमान नगरसेविका उषा पाटील यांचे ते पती आहेत. 

जळगाव शहरालगत सावखेडा शिवारात असलेल्या शेतात संतोष पाटील गेले होते.आर्यन पार्कजवळ त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला.त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तेथून हलवून सहयोग क्रिटीकल सेंटर येथे दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. गोळीबार कुणी केला? तसेच त्यांचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

संबंधित लेख