भाजप-सेना युतीने विदर्भातील चार सेना खासदारांचा सुस्करा

भाजप-सेना युतीने विदर्भातील चार सेना खासदारांचा सुस्करा

नागपूर : भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याने विदर्भातील सेना खासदारांचा सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. युतीमुळे सेना खासदारांना आता निवडून येण्याची हमी मिळाल्याचे बोलले जात आहे. भाजप-सेना युती व्हावी, ही तर जनतेचीच इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया सेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केली.

विदर्भात लोकसभेचे दहा मतदारसंघ असून त्यापैकी 6 मतदारसंघ भाजपला तर 4  शिवसेनेकडे आहेत. विदर्भात भाजपचे संघटनात्मक शक्ती चांगली आहे. याचा फायदा नेहमीच्या सेनेच्या उमेदवारांना होतो. लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढविली तरी शिवसेनेच्या उमेदवारांना लढत चांगलीच जड गेली असती. यामुळे विदर्भातील खासदार युती व्हावी, या बाजूने मत टाकले होते. युतीचा निर्णय होत नसल्याने विदर्भातील खासदारांमध्ये काही साशंकता होती. मुख्यमंत्री फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होऊन युती होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने विदर्भातील सेना खासदारांना दिलासा मिळाला आहे.

विदर्भातील रामटेक, यवतमाळ-वाशिम, अमरावती व बुलडाणा हे मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. यापैकी रामटेक, यवतमाळ-वाशिम व अमरावती या मतदारसंघात भाजप प्रबळ आहे. या मतदारसंघांमध्ये सेनेला स्वतंत्रपणे लढणे धोक्‍याचे होते. याची कबुली या तिन्ही खासदारांनी "मातोश्री'कडे दिल्याचे समजते.

या संदर्भात "सरकारनामा'शी बोलताना रामटेकचे खासदार कृपाल तुमाने म्हणाले, भाजपशी शिवसेनेची नैसर्गिक युती आहे. युती व्हावी, ही जनतेचीच इच्छा आहे. निवडणुकांमध्ये भाजपचा सेनेला व सेनेचा भाजपला फायदा होत असतो. भाजप-सेनेची युती होणे दोन्ही पक्षांसाठी फायद्याचे आहे.

भाजप-सेनेची युती होत नसल्याने सेना खासदारांमध्ये असुरक्षिततेची भावना होती. फडणवीस-ठाकरे यांच्यात चर्चा झाल्यानंतर भाजप-सेना युती होणार हे स्पष्ट झाल्याने सेनेच्या खासदारांनी आता नव्या जोमाने कामाला लागण्याची तयारी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com