| Sarkarnama

आयुक्त तुकाराम मुंढेनी बेपत्ता झालेल्या अभियंत्याला परत पाठवले 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 31 जुलै 2018

कामाच्या अतिताणामुळे बेपत्ता होऊन परतलेले महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील सेवेत पुन्हा दाखल झाले. परंतू, प्रशासनाने वैद्यकीय विभागाकडून मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचा सल्ला दिल्याने पाटील यांचा प्रवेश लांबणीवर पडला आहे.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यामुळे कामाचा ताण आल्याचे कारण सांगत आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता झाले होते. ते तीन महिन्यांनी कामावर परतले. मात्र, त्यांना रुजु न करता आधी मानसिकदृष्ट्या सक्षम आहात काय? याचे प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश देत परत पाठवण्यात आले आहे. त्यामुळे बेपत्ता होऊन प्रशासनाला त्रस्त करणाऱ्या रवींद्र पाटील यांच्यावरच डाव उलटतो की काय? याची चर्चा सुरु आहे. 

कामाच्या अतिताणामुळे बेपत्ता होऊन परतलेले महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील सेवेत पुन्हा दाखल झाले. परंतू, प्रशासनाने वैद्यकीय विभागाकडून मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचा सल्ला दिल्याने पाटील यांचा प्रवेश लांबणीवर पडला आहे. तुकाराम मुंढे यांनी आयुक्त म्हणुन पदभार स्विकारल्यावर प्रशासकीय कामकाजात अनेक सुधारणा व शिस्त आणली. त्याने कामकाजात आमूलाग्र बदल घडला. सर्वच विभागांत बदल्यांचे सूत्र अवलंबिले. त्यामुळे अनेक वर्षे एकाच खुर्चीवर टिकून राहिलेल्यांची चांगलीच धावपळ झाली. परिणामी काहींवर कामाचा ताण वाढला. 

या ताणातून मार्चमध्ये अभियंता पाटील चिठ्ठी लिहून घरातून बेपत्ता झाले होते. काही दिवसांनी पुणे येथून नाशिक पोलिसांनी त्यांना सुखरूप परत आणले. यानंतर तीन महिने न कळवताच अन्‌ रजा मंजुर न करताच कामावर गैरहजर होते. तीन महिन्यांनी ते सोमवारी कामावर परतले. मात्र, प्रशासनाकडून त्यांना रुजु करुन घेतले नाही. 

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख