उन्हामुळे ईव्हीएम बिघडते, हे कोणत्या तंत्रज्ञाने सांगितले? : नाना पटोले यांचा सवाल 

उन्हामुळे ईव्हीएम बिघडते, हे कोणत्या तंत्रज्ञाने सांगितले? : नाना पटोले यांचा सवाल 

उन्हामुळे मतमोजणीच्यावेळीही

ईव्हीएम हॅंग होण्याची शक्‍यता 

नागपूर : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्यावेळी अनेक ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता. यासाठी तीव्र उष्णतामान कारणीभूत असल्याचा दावा निवडणूक अधिकाऱ्यांनी केला होता. आता मतमोजणीच्या वेळीही तीव्र उष्णता राहणार असल्याने यावेळी ईव्हीएममध्ये बिघाड होणार नाही, याची हमी निवडणूक अधिकारी घेणार काय? उन्हामुळे ईव्हीएम बिघडते, हे कोणत्या तंत्रज्ञाने सांगितले, असा सवाल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे. 

सोमवारी झालेल्या मतदानाच्यावेळी जवळपास 1800 ईव्हीएमध्ये बिघाड झाला होता. त्यातील 450 ईव्हीएममध्ये काही तासांसाठी मतदानाची प्रक्रिया थांबवावी लागली होती. या बिघाडासाठी या भागातील तीव्र उष्णतामान कारणीभूत असल्याचा दावा निवडणूक अधिकाऱ्यांनी केला आहे. यावर 'सरकारनामा'शी बोलताना "मे महिन्यात विदर्भात उष्णतामान 45 अंश सेल्शियसपेक्षा जास्त असते, याची कल्पना जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांना नव्हती का? उन्हामुळे ईव्हीएममध्ये बिघाड होते, हे कोणत्या तंत्रज्ञांनी सांगितले? जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांना ईव्हीएमच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास आहे काय?" असे प्रश्‍न नाना पटोले यांनी उपस्थित केले. 

या पोटनिवडणुकीची मतमोजणी येत्या 31 मे रोजी होणार आहे. केवळ दोन दिवसांनी होणाऱ्या मतमोजणीच्यावेळी ऊनच असणार आहे. ही ईव्हीएम ज्या ठिकाणी ठेवली, त्याठिकाणी उष्णतामान कमी ठेवण्यासाठी प्रशासन व निवडणूक अधिकाऱ्यांनी काय व्यवस्था केली, असा प्रश्‍न पटोले यांनी केला आहे. ही व्यवस्था नसेल व ईव्हीएममधील 'डाटा' उष्णतेमुळे खराब झाला, तर यासाठी जबाबदार कोण? असा प्रश्नही पटोले यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com