जिल्ह्यात दीड वर्षात दोनशेहून अधिक शेतकरी आत्महत्या सत्तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या ठरल्या अपात्र

शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने समस्या सुटतात, असे होत नाही. उलट शेतकऱ्यांच्या कुटुंबियासमोरील संकटे अधिकचे उभे राहतात. कुटुंब उघडयावर येते. शेतकरी आत्महत्यानंतर मिळणारी मदत हा गौण विषय आहे. परंतू, त्या कुटुंबामधील कर्ता शेतकरी निघून जाणे म्हणजे, कुटुंबावर डोंगर कोसळल्यासारखे असते.
जिल्ह्यात दीड वर्षात दोनशेहून अधिक शेतकरी आत्महत्या सत्तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या ठरल्या अपात्र

नांदेड - अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोरील भय संपण्याचे नाव घेत नाही. गेल्या दीड वर्षांच्या काळात २३० शेतकऱ्यांनी आत्महत्या जीवनयात्रा संपविली आहे. यात जवळपास ७० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या 'निकषा'स पात्र ठरल्या नाहीत ही धक्कादायक वस्तुस्थिती आहे.

नांदेड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ झाला, की अवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांना बसतो . त्यानंतर कसेबसे पीक आले, की सरकारचा सुलतानी कारभार, उत्पादनाला मिळणारा कवडीमोड भाव, यातून शेतीवर केलेला खर्च बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना परवडत नाही. वरुन बँकांचे कर्ज, सावकारचा तगादा यात शेतकरी मानसिक दृष्टया खचतो आहे.कुटुंब प्रपंच, मुला-बाळांची शिक्षण, मुलीचे लग्न, या सगळया बाबी सांभाळताना, निसर्गाचा लहरीपणा अन वाढत जाणारा कर्जाचा डोंगर हे शेतकऱ्याच्या नाकातून दम काढतात.

सावकार कर्जापायी शेत लिहून घेण्याची भाषा करतो अन मग मरणावाचून गत्यंतर नाही, अशी भावना जेव्हा सतत घर करून बसते, तेव्हा शेतकरी आत्महत्येचा विचार करतो. अन शेवटी आत्महत्या करून या जगाचा निरोप घेतो. मागच्या वर्षी एक जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान १८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील ११७ पात्र शेतकरी आत्महत्या ठरल्या आहेत. तर ६३ अपात्र आहेत. यातील शंभर टक्के प्रकरणे निकाली निघाले आहेत. सन २०१७ मध्ये मे महिन्यांपर्यंत ५४ शेतकऱ्यांनी जीवनाचा त्याग केला आहे. यातील ३७ शेतकरी आत्महत्या पात्र ठरल्या आहेत. अपात्र ५ असून १२ प्रकरणे प्रलंबित आहेत.

शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने समस्या सुटतात, असे होत नाही. उलट शेतकऱ्यांच्या कुटुंबियासमोरील संकटे अधिकचे उभे राहतात. कुटुंब उघडयावर येते. शेतकरी आत्महत्यानंतर मिळणारी मदत हा गौण विषय आहे. परंतू, त्या कुटुंबामधील कर्ता शेतकरी निघून जाणे म्हणजे, कुटुंबावर डोंगर कोसळल्यासारखे असते.

दीड वर्षांमधील आत्महत्या

             २०१६          २०१७

जानेवारी       १४---------११

फेबु्रवारी      १२---------११

मार्च             १२---------१५

एप्रिल           १९---------१३

मे                १८---------४

जून             १२---------०

जुलै             १०---------०

ऑगस्ट         २०---------०

सप्टेंबर          १७---------०

ऑक्टोबर      १७---------०

नोव्हेंबर         १६---------०

डिसेंबर         १३---------०
 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com