227 grant for hiranyakeshi project | Sarkarnama

आजरा, गडहिंग्लजसाठी महत्वपूर्ण असलेल्या 'हिरण्यकेशी' प्रकल्पासाठी 227 कोटी मंजूर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

या प्रकल्पासाठी मूळ प्रशासकीय मान्यता ऑक्‍टोबर 1998 मध्ये घेण्यात आली होती

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा व गडहिंग्लज तालुक्‍यातील सिंचन क्षेत्र वाढीसाठी महत्वपूर्ण असलेल्या हिरण्यकेशी (आंबेमोहोळ) मध्यम प्रकल्पाच्या 227.54 कोटी रुपयांच्या खर्चाच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावास व्यय अग्रक्रम समितीने मंजुरी दिली आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जलसंपदा विभागाने हि मान्यता दिली.

आजरा तालुक्‍यातील आर्दळ गावाजवळ हिरण्यकेशी नदी खोऱ्यातील आंबेमोहोळ नाल्यावर होणाऱ्.ा प्रकल्पात कोल्हापूर पद्धतीचे 7 बंधारे बांधण्यात येत आहेत. या बंधाऱ्यामधून व जलाशयातून आजरा व गडहिंग्लज तालुक्‍यातील 3925 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पाच्या मातीच्या धरणाचे 80 टक्के, पृच्छ कालव्याचे 80 टक्के काम तर विद्युत विमोचकाचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. परंतु अद्याप प्रकल्पामध्ये घळभरणी झाली नाही.

या प्रकल्पासाठी मूळ प्रशासकीय मान्यता ऑक्‍टोबर 1998 मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता जानेवारी 2010 मध्ये घेण्यात आली. प्रकल्पाची कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याने द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने व्यय अग्रक्रम समितीसमोर सादर केला होता.

227.54 कोटी रुपयांच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प सण 2019- 20 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी कामांचा प्राधान्यक्रम ठरवून निविदा प्रक्रिया सुरु असलेली कामे पूर्ण करण्यात येणार आहे. संपूर्ण 100 टक्के सिंचन क्षमता निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख