| Sarkarnama

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या `रासरंग'वर अखेर `त्यांना' मिळाले स्थान!

शर्मिला वाळुंज
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या रासरंग या उपक्रमाच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये पक्षातील स्थानिक कार्यकर्ते व पक्षाच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे या उत्सवात ``वन अॅण्ड ओन्ली'' खासदार शिंदे यांच्याच नावाचा दबदबा दिसून येत असल्याचे वृत्त ``सरकारनामा''ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत खासदारांनी लागोलाग प्रसिद्धीपत्रकात बदल करत पक्षातील कार्यकर्त्यांची नावे व त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. अखेर प्रसिद्धीपत्रकावर छायाचित्रांसह नाव झळकल्याने शिवसैनिक मनोमन सुखावल्याचे दिसून आले.

ठाणे : डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या रासरंग या उपक्रमाच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये पक्षातील स्थानिक कार्यकर्ते व पक्षाच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे या उत्सवात ``वन अॅण्ड ओन्ली'' खासदार शिंदे यांच्याच नावाचा दबदबा दिसून येत असल्याचे वृत्त ``सरकारनामा''ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत खासदारांनी लागोलाग प्रसिद्धीपत्रकात बदल करत पक्षातील कार्यकर्त्यांची नावे व त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. अखेर प्रसिद्धीपत्रकावर छायाचित्रांसह नाव झळकल्याने शिवसैनिक मनोमन सुखावल्याचे दिसून आले.
 
सण उत्सवांच्या माध्यमातून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सध्या राजकीय पक्षांचे सुरु असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त लागलेल्या बॅनरवर हे राजकारणी झळकत आहेत. सत्तेत मित्रपक्ष असलेला शिवसेना व भाजप प्रत्यक्षात मैदानात मात्र एकमेकांपेक्षा वरचढ ठरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुजराती मतदारवर्ग आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप व सेना या दोन्ही पक्षांनी डोंबिवलीत प्रथमच भव्य दांडीया महोत्सवाचे आयोजन केले आहे. 

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावतीने आयोजित डोंबिवली रासरंग या दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी पत्रकावर खासदार शिंदे यांनी पक्षाचा, पक्षातील कार्यकर्त्यांचा उल्लेख टाळला होता. वन अॅण्ड ओन्ली खासदार ज्युनिअर शिंदे व सिनिअर शिंदे या प्रसिद्धी पत्रिकेवर झळकले होते. मात्र खासदारांच्या या भूमिकेमुळे शिवसेना कार्यकर्ता मनातून दुखावला गेला होता. याविषयीचे वृत्त सरकारनामामध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच खासदार शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात लागोलाग बदल केल्याचे दिसून आले. 
प्रसिद्धीपत्रकावर दिवंगत सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांसह कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, आमदार सुभाष भोईर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांसह कल्याण डोंबिवलीतील सर्व शिवसेना पदाधिकाऱयांचे छायाचित्र व नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. शिवसैनिकांचे नाव तसेच छायाचित्रही प्रसिद्धी पत्रकावर छापून आल्याने शिवसैनिक मनोमन सुखावला आहे. 

संबंधित लेख