| Sarkarnama

आयाराम चालेल, पण, जिंकणारा हवा ! 

sarkarnama
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई : पक्षाचा निष्ठावंत पदाधिकारी असेल तरच त्याला उमेदवारीसाठी पहिले प्राधान्य देण्याच्या भाजपच्या अलिखित अजेंड्याला बाजूला ठेवून 2019च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकहाती सत्तेवर येण्याची रणनीती भाजपने आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्या लोकसभा मतदारसंघात हमखास निवडून येईल अशाच पक्षबदलू उमेदवारालाही प्रसंगी तिकीट दिले जाणार आहे.

एखाद्या मतदारसंघात दुसऱ्या पक्षातील प्रबळ उमेदवारही ऐनवेळी पक्षात येणार असेल तर त्याला ही भाजपमध्ये सन्मानाने घेतले जाणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. 

भाजपच्या या व्यवहारी फॉर्म्यल्यामुळे पक्षबदलू, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अन्य पक्षाच्या उमेदवारांसाठी भाजपची दारे उघडी राहणार असल्याचे दिसून येत आहे. सम्पूर्ण बहुमताचे लक्ष गाठत 2019च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भाजप नेते आणि पदाधिकारी यांना आतापासून जोमाने कामाला लागा असे फर्मान सोडले आहे.

भाजपला स्वबळावर किमान 360 खासदार निवडून आणायचे आहेत. त्यामुळे मतदारसंघात वर्चस्व असलेल्या आयारामाना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्‍यता दाट आहे. त्याचप्रमाणे असे प्रबळ उमेदवार पक्षात येणार असतील तर चाचपणी करावी अशा सूचना देण्यात आल्याचे सूत्राकडून समजते. 

केंद्रीय मंत्र्यांना ही पक्ष नेतृत्वाने देशातील काही निवडक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविली असून या मतदारसंघातील भाजपला अनुकूल परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे समजते.

तसेच लोकसभा मतदारसंघाची बांधणी करताना त्या मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाची काय स्थिती आहे यावर लक्ष ठेवण्यात यावे याकडे लक्ष देण्यात सांगितले आहे. 

संबंधित लेख