| Sarkarnama

आजचा वाढदिवस : सुधीर मुनगंटीवार, अर्थ व वनमंत्री.

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 जुलै 2017

भारतीय जनता युवा मोर्चातून राजकीय पदार्पण करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या राजकारणात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. चंद्रपूर व नागपूर येथे शिक्षण घेतल्यानंतर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर भाजपमध्ये प्रवेश केला. 1991 ची लोकसभा निवडणूक लढविली. या निवडणुकीत अपयश आले. परंतु 1995 मध्ये त्यांनी चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत यश मिळविले. तेव्हापासून त्यांनी कधीही पराभव पाहिला नाही. 2009 मध्ये चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर त्यांनी शेजारच्या बल्लारपूर मतदारसंघातून विजय मिळविला. 2014 च्या निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यानंतर यात त्यांच्याकडे अर्थ व वन खात्याचे मंत्रीपद आले आहे. चंद्रपूर महापालिका करणे, उड्डाण पूल करून चंद्रपूर शहराच्या विकासामध्ये त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. त्याचप्रमाणे ताडोबा अभ्यायारण्याच्या विकासासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याचप्रमाणे राज्यात 4 कोटी वृक्षारोपणाचा धडक कार्यक्रम त्यांनी हातात घेतला आहे. 

संबंधित लेख