| Sarkarnama

पिंपरी  : सर्व्हेअर आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची खातेनिहाय चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

पिंपरी  : गुन्हा दाखल असल्याच्या कारणावरून सर्व्हेअर सुभाष खरात यांचे निलंबन करून खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे. तर, "फ' क्षेत्रीय कार्यालयाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक चंद्रशेखर नार्वेकर यांची फक्त खातेनिहाय चौकशी लावण्यात आली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेश दिले आहेत. 

खरात यांच्याविरूद्ध पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सरकारी मोजणीचा बनावट नकाशा बनविण्यामध्ये प्रमुख सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या आरोपावरून 17 जूनला त्यांना पोलिसांनी अटक केली होती. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. सर्व्हेअर या जबाबदारीच्या पदावर कार्यरत असताना झालेले गैरवर्तन लक्षात घेता त्यांना अटक झाल्याच्या दिनांकापासून निलंबित केले आहे. तसेच, खातेनिहाय चौकशी लावली आहे. 

नार्वेकर यांच्याविरूद्ध निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही बाब त्यांनी महापालिकेच्या निदर्शनास आणून दिलेली नाही. दाखल गुन्ह्यात त्यांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला आहे. विनापरवाना गैरहजर राहणे, नियम आणि शिस्तीचा भंग, कर्तव्यात हयगय अशा विविध कारणास्तव त्यांची खातेनिहाय चौकशी आयुक्तांनी सुरू केली आहे. त्यांची विनापरवाना गैरहजेरी असाधारण रजेत परावर्तित केली आहे. तसेच, सत्र न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून त्यांना कामावर रुजू करून घेण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. 

संबंधित लेख