| Sarkarnama

आजचा वाढदिवस : योगेश बहल, माजी महापौर, विरोधी पक्षनेते, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 जुलै 2017

योगेश बहल हे पिंपरी-चिंचवडमधले राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. ते महापौर आणि पक्षाचे अध्यक्षही होते. सध्या ते विरोधी पक्षनेतेपदी काम करत आहेत. नगरसेवकपदाची त्यांची ही सहावी टर्म आहे. महापालिकेच्या सध्याच्या सभागृहात ते सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक आहेत. 2010 ते 12 असे अडीच वर्षे ते महापौर,तर 2012 ते 2015 राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष होते. मूळचे पंजाबी असले, तरी मराठीवर त्यांचे प्रभुत्व असून फर्डे वक्ते आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून ते ओळखले जातात. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्‍वासू सहकारी म्हणूनही त्यांचे नाव घेतले जात आहे. 

संबंधित लेख